yellow-milk
yellow-milk 
myfa

हळदीचे दूध आणि काढा ते कसे बनवायचे, हे आपण आज पाहूयात

मनिषा बंदिष्टी

जगभरात सुरू असलेली कोरोनाची साथ आणि पावसाळ्यामुळे प्रतिकारशक्ती चांगली असणे खूप गरजेचे बनले आहे. कोणताही पदार्थ चविष्ट बनवण्यासाठी पारंपरिक भारतीय मसाल्यांचा आपण वापर करतो. हे मसाले पौष्टिक असतातच, शिवाय त्यांच्यामध्ये औषधी गुणधर्मही मोठ्या प्रमाणावर असतात. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे दूध आणि हे पारंपरिक मसाला घालून केलेला काढा अतिशय उपयुक्त आहे. ते कसे बनवायचे, हे आपण आज पाहूयात. दररोज रात्री झोपताना हळदीचे दूध व सकाळी उठल्यावर काढा अवश्य घ्या. 

हळदीचे दूध 
साहित्य - एक ग्लास दूध, अर्धा चमचा हळद, काळी मिरी पावडर 
कृती - ग्लासभर दुधात अर्धा चमचा हळद आणि काळी मिरी पावडर टाकून व्यवस्थित उकळावे. रात्री गरम प्यावे. हळदीमध्ये कर्क्युमिन रसायन असते. काळी मिरी पावडरीमुळे ते शोषले जाते. 

काढा 
साहित्य - दीड ग्लास पाणी, किसलेले आले, जीरा पावडर, दालचिनी, ओवा, बडिशेप, लवंग. तुळशीची पाने, लिंबू 
कृती - तुळशीची पाने व लिंबू वगळता इतर सर्व साहित्य पाण्यात उकळावे. साधारण एक ग्लास पाणी होऊ द्यावे. त्यानंतर, गरजेप्रमाणे लिंबू पिळावे. आपला गरम, औषधी काढा तयार झाला. 

विशेष सूचना - तुम्हाला वरीलपैकी कोणताही पदार्थ टाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्यास तो वगळून काढा तयार करावा. 

(Edited by : Kalyan Bhalerao)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, तर सोलापुरातील दोन गावांचा मतदानावर बहिष्कार

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT