vida-leaves
vida-leaves 
myfa

पचनकारक विड्याची पाने 

डॉ. मनीषा बंदिष्टी, ओबेसिटी आणि लाइफस्टाइल मॅनेजमेंट कन्सल्टंट

छान भरपेट जेवण झाल्यानंतर किंवा अगदी सवय म्हणूनही विड्याचं पान खाल्लं जातं हे आपल्याला माहीत आहे. त्याला इंग्लिशमध्ये ‘बेटेल लीफ’ असं म्हटलं जातं. विड्याच्या किंवा खाऊच्या पानाला भारतात अनेक धार्मिक रितीरिवाजांमध्येही महत्त्व आहे. बदामाच्या आकारची ही पानं आरोग्यदृष्ट्या महत्त्वाची आहेत. पानांतील कॅल्शिअम अधिकाधिक पचावं यासाठी ही पानं अनेकदा चुन्यासह (स्लॅक्ड लाइम) खाल्ली जातात. जेवण झाल्यावर ही पानं का खाल्ली जातात, त्यांचं नक्की महत्त्व काय आहे असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? आपण या सगळ्यावर एक नजर टाकू. 

विड्याच्या पानांचे फायदे 
पचन सुधारतं :
विड्याची पाने चयापचयाची प्रक्रिया वाढवतात. अधिक व्हिटॅमिन्स आणि पोषक घटक ॲब्सॉर्ब करण्यासाठी आतड्यांना स्टिम्युलेट करतात. 

बद्धकोष्ठता कमी होते : विड्याची पानं ही ‘अँटीऑक्सिडंट्सची पॉवरहाऊस’ मानली जातात. ती शरीरातील पीएच पातळी नेहमीच्या पातळीवर आणण्यासाठी मदत करतात आणि बिघडलेलं पोट पूर्वपदावर येण्यासाठी मदत होते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नैसर्गिक वेदनाशामक : विड्याची पानं नैसर्गिक वेदनाशामक मानली जातात. वेदना होणाऱ्या भागात ती बाहेरून लावता येतात किंवा वेदना कमी होण्यासाठी ती नुसती चघळण्याचाही फायदा होऊ शकतो. 

अंतर्गत अवयव ‘स्वच्छ’ होतात : 
- विड्याची पानं शरीरात जमलेली विषारी द्रव्यं बाहेर काढून टाकण्यासाठी मदतशील ठरतात. 
- ती तुमचं चयापचय वाढवतात आणि शरीरातल्या अंतर्गत अवयवांचाही रक्तपुरवठा सुधारतात. 
- फंगल इन्फेक्शन्स रोखली जातात. 
- विड्याच्या पानांमधले अँटिसेप्टिक, अँटी-फंगल; तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म विविध संसर्ग रोखण्यासाठी उपयुक्त ठरतात. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नैसर्गिक ‘माऊथ फ्रेशनर’ : 
- विड्याची पानं तुमच्या श्वासातील दुर्गंधी कमी करतात आणि मौखिक आरोग्य सुधारतात. 
- विड्याच्या पानांमुळे तुमच्या दाढा मजबूत होतात आणि दात किडणंही रोखलं जातं. 
- तोंडाचे अल्सर्स, तोंडातील जखमा आणि सुजलेपण या गोष्टी बऱ्या होण्यासाठी ही पाने उपयोगी पडतात. 

तुमचा मूड सुधारतात : 
- विड्याची पानं नैराश्य घालवतात आणि मानसिक आरोग्य सुधारतात. 
- विड्याची पानं योग्य प्रमाणात नियमितपणे खायला सुरवात केल्यास तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि ती पूर्णपणे नैसर्गिक मूड बूस्टर आहेत. 

विड्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ‘सी’, व्हिटॅमिन ‘बी १’ (थिआमाइन), व्हिटॅमिन ‘बी ३’ (नियासिन), व्हिटॅमिन ‘बी २’ (रायबोफ्लॅविन), कॅरोटिन आणि उत्तम प्रमाणात कॅल्शिअम असतं. त्यांच्यामुळे अनेक आरोग्यविषयक फायदे मिळतात. त्यामुळे विड्याची पानं तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात समाविष्ट करू शकता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT