Shanshank shah article online food
Shanshank shah article online food 
myfa

'ऑनलाइन' फूड ऑर्डर करत असाल तर, हे वाचा!

डॉ. शशांक शहा, लठ्ठपणा तज्ज्ञ, बेरियाट्रिक सर्जन

तुमच्या पॅंटची साइज सातत्यानं वाढतेय ना? याचा अर्थ तुमचा प्रवास स्थूलता, लठ्ठपणाच्या दिशेने वेगाने सुरू झालाय. शाळेत जाणारी दहा-बारा वर्षांची मुलंही याला अपवाद राहिलेली नाहीत. घरी न जेवता ऑनलाइन ऑर्डर करण्याचा नवा ट्रेंड याला जबाबदार असल्याचंच आकडेवारी सांगते.

आपण घरात स्वयंपाक करताना आपल्या पाहिजे तेवढं, आपल्यापुरताच करतो. त्यात आपल्याला असलेल्या भुकेचाही विचार आपोआप होतो. पण खाद्यपदार्थाची 'ऑनलाइन ऑर्डर' करताना तुम्ही काय पाहतो हो? आपल्याला भूक किती आहे, याचा विचार आपण करतो का? कशावर काय 'ऑफर' आहे हे पाहतो. खूप वेळेला 'डिस्काउंट ऑफर' आहे म्हणूनच ऑर्डर केली जाते. गरज नसताना वेगवेगळ्या 'कॉम्बो पॅक'च्या आहारी आपण आपल्या नकळत जातो. हेच खाद्यपदार्थ मुलांनाही दिले जातात. याच खाद्यपदार्थांची, ऑनलाइन ऑर्डर करून जेवण मागविण्याची सवय मुलांनाही पटकन लागते. मुलानं ॲपवर ऑनलाइन ऑर्डर केली. तर त्याचं पालक तोंडभरून कौतुक करतात. पण, हे करत असताना पालकांच्या कुठंही लक्षात येत नाही की, यात तेलाचं प्रमाण जास्त आहे, जास्तीची ट्रान्स फॅट, प्रिझर्वेटिव्हचं मोठं प्रमाण, सढळ हातानं घातलेली साखर आहे. या सगळ्यांमुळं आपल्याही नकळत एक जेवण हे तीन-चार जेवणांच्या बरोबरीनं होतंय. या बद्दलची माहिती तसेच, याच्या जनजागृतीचाही अभाव प्रकर्षाने जाणवतो.

पोटात जाणाऱ्या प्रत्येक घासातून आपल्या शरीराला कोणती पोषणमूल्यं मिळताहेत त्याचा विचार आपण कधीतरी करणार आहोत का? आपण किती उष्मांक शरीरात घेतोय, हे बघण्याची सवय विसरत आहोत. लहान मुलांनाही वाढत्या वयात चांगले पोषणमूल्य असलेला आहार मिळावा, असा जो वर्षांनुर्षाचा आई-वडिलांचा विचार होता, तो आता हरवत चाललाय. छान चवीचं, लगेच मिळणारं खाण्याकडं मुलांचा कल वाढत आहे. त्यातून लहान वयात आजारपण येत आहेत. लठ्ठपणा वाढत आहे. तारुण्यात संप्रेरकांमध्ये होणारे बदल हे याचे दिसणारे ठळक दुष्परिणाम आपण अजून किती दिवस डोळ्यांआड करणार आहोत?

का झाली मुलं बेडौल?
अगदी गेल्या चार-पाच वर्षांपर्यंत सुडौल असणारं आपलं मुलं इतक्‍या झटपट कसं बेडौल झालं, हे त्यांच्या दहा-बारा वर्षांच्या मुलांच्या पालकांनाही समजेनासं झालंय. पण, एका प्रश्‍नाचा विचार करा की, तुम्ही पहिला स्मार्ट फोन कधी घेतला? त्यात 'डाऊनलोड' केलेल्यांपैकी सहजतेने ऑनलाइन 'फुड ऑर्डर' देणारे किती ॲप्स तुमच्या मोबाईलच्या 'प्ले स्टोअर' किंवा 'ॲप स्टोअर'मध्ये आहेत, हे जरा बघा. मुलं बेडौल का झाली, या प्रश्‍नाचं उत्तराला आधुनिक काळात या मुद्यापासून सुरुवात होते. विशेषतः राज्याच्या शहरी भागात प्रकर्षानं जाणवतं. किंबहुना शहरातील लठ्ठपणाचं विशिष्ट कारणं नव्यानं पुढं येताहेत. पूर्वी सर्व जण घरात जेवत, त्यासाठी आवश्‍यक स्वयंपाकही घरीच केला जाई. या आपल्या समाजव्यवस्थेमध्ये पूर्वापार चालत आलेल्या परंपरेला आधुनिक युगात छेद गेल्याचे आपल्याला सर्वदूर दिसते. पुण्या-मुंबईसारख्या असंख्य शहरांमध्ये घरात स्वयंपाक करण्याऐवजी खाद्यपदार्थांची 'ऑनलाइन ऑर्डर' करायची सवय पालकांना झालीये. ही ऑर्डर करावी लागण्यामागची कारणं ही निश्‍चित वेगवेगळी आहेत. कधी स्वयंपाकाला वेळ न झाल्यानं, कामाच्या ताणतणावामध्ये किंवा कामाच्या निमित्ताने लवकर घराबाहेर पडावं लागत असल्यानं खाद्यपदार्थांची 'ऑनलाइन ऑर्डर'ची नवी संस्कृती गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या डोळ्यांदेखत रुजली आणि आता ती बेसुमार वेगानं वाढत आहे.

थोडा-थोडा व्यायाम जास्त वेळा करा
नवीन संशोधनाप्रमाणं आता तुम्ही थोडा-थोडा व्यायाम दिवसभरात जास्त वेळा केला, तरीही तुम्हाला नियमित व्यायामाइतकाच किंबहुना त्याही पेक्षा जास्तच फायदा होऊ शकतो. अर्धा तास धावायच्या ऐवजी तुम्ही पाच-पाच मिनिटे सहा वेळा धावला तर त्याचा परिणाम सारखाच होतो. हा आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत उपयोगी असणारा नवीन 'ट्रेंड' आहे. कारण, एका वेळी धावण्यासाठी अर्धा तास काढणे, त्यापूर्वी तयारी करणे यासाठी वेळ मिळत नाही, असे म्हणणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. त्यामुळे दर दोन तासांनी तुम्ही पाच मिनिटांचा ब्रेक घेऊन पाच-पाच मिनिटे सहा वेळा चालल्यास दिवसभरातील व्यायाम सहजतेने भरून काढता येतो.

मॅरेथॉन पार्ट्यांना करतेय 'रिप्लेस'
काही पावलंही न चालता येणारे लोकही बेरियाट्रिक सर्जरीनंतर आज-काल मॅरेथॉनसारख्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा आनंद लुटताना दिसतात. त्याचं कारण, जे 'मिळवलं' ते घालवू नये, अशी इच्छा असल्यानं ते तंदुरुस्त होण्याच्या अशा वेगवेगळ्या उपक्रमात सातत्याने सहभागी होतात. ट्रेकिंग, वॉकिंग, सायकलिंग आणि मॅरेथॉन या गोष्टी बेरियाट्रिक सर्जरीनंतर पार्ट्यांना 'रिप्लेस' करतात. यातून पळण्याच्या आनंदाबरोबरच आपण सहभागी झालो, याचेही मोठे समाधान स्पर्धकांना मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT