myfa

Healthy Food : मधुमेह, इन्शुलिन आणि वजन

इन्शुलिन हे हार्मोन रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे नियमन करते.

शौमा मेनन

इन्शुलिन हे हार्मोन रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे नियमन करते. ग्लुकोजचे दुसरे नाव ‘रक्तातील साखर’ असेही आहे. हे हार्मोन शरीरातील पेशींना ग्लुकोज शोषून घेण्यासाठी मदत करतात. पेशींनी मोठ्या प्रमाणात ग्लुकोज शोषून घेतल्यास व शरीर त्याचे रूपांतर फॅटमध्ये करते, अशाप्रकारे इन्शुलिनमुळे वजन वाढते. इन्शुलिन शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्याचे काम करते व त्याचप्रमाणे अन्नातून मिळणाऱ्या ऊर्जेचे रूपांतर फॅट्समध्ये करते. त्याचा उपयोग फॅट्स आणि प्रथिने वेगळे करण्यासाठीही (ब्रेक डाऊन) केला जातो. पचनाची क्रिया होताना इन्शुलिन स्नायू, फॅट्स आणि यकृताच्या पेशींना उत्तेजित करून ग्लुकोज शोषून घेण्यास मदत करते.

पेशी या ग्लुकोजचा उपयोग ऊर्जा म्हणून करतात किंवा त्याचे फॅट्समध्ये रूपांतर करीत मोठ्या काळासाठी शरीरामध्ये साठवून ठेवतात. शरीराला आवश्‍यक आहेत, त्यापेक्षा अधिक कॅलरिजचे सेवन केल्यास शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढते. पेशींनी रक्तातून ग्लुकोज बाहेर न काढल्यास शरीर त्याला टिश्‍यूंमध्ये फॅट्सच्या स्वरूपात साठवून ठेवते. एखादा रुग्ण मधुमेहावरील उपचार म्हणून इन्शुलिन घेतो, तेव्हा त्याचे शरीर अन्नातील ग्लुकोज मोठ्या प्रमाणावर शोषून घेते व त्यामुळे व्यक्तीचे वजन वाढू लागते. मधुमेहावर कोणतेही उपचार न घेतल्यास वजन कमी होण्यास सुरुवात होते, कारण शरीर अन्नाचे ऊर्जेमध्ये योग्यप्रकारे रूपांतर करू शकत नाही. इन्शुलिन योग्य प्रमाणात घेतल्यास हा प्रश्‍न सुटतो. त्यामुळेच लोक जेव्हा इन्शुलिन घेण्यास सुरुवात करतात, तेव्हा त्यांचे वजन वाढल्याचे निदर्शनास येते.

मधुमेह आणि वजनातील वाढ

वजनातील वाढ हे मधुमेह आणि इतर इन्शुलिनशी संबंधित आजारांत दिसणारे सामान्य लक्षण आहे. इन्शुलिन थेरपीचा साइड इफेक्ट म्हणून वजन वाढल्याचा अनुभव अनेक रुग्ण घेत असतात. इन्शुलिनमुळे रुग्णाच्या शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित होत असले, तरी त्यामुळे शरीरामध्ये फॅट्सचा संचय होऊ लागतो. शरीराचे वाढलेले वजन नियंत्रित करून मधुमेहाची लक्षणे नियंत्रणात आणता येऊ शकतात आणि त्याचबरोबर प्रि-डायबेटिक आणि इन्शुलिन रेझिस्टन्सची परिस्थिती पूर्वपदावर आणण्यास मदत होऊ शकते.वजनातील वाढ हे मधुमेह आणि इतर इन्शुलिनशी संबंधित आजारांत दिसणारे सामान्य लक्षण आहे. इन्शुलिन थेरपीचा साइड इफेक्ट म्हणून वजन वाढल्याचा अनुभव अनेक रुग्ण घेत असतात. इन्शुलिनमुळे रुग्णाच्या शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित होत असले, तरी त्यामुळे शरीरामध्ये फॅट्सचा संचय होऊ लागतो. शरीराचे वाढलेले वजन नियंत्रित करून मधुमेहाची लक्षणे नियंत्रणात आणता येऊ शकतात आणि त्याचबरोबर प्रि-डायबेटिक आणि इन्शुलिन रेझिस्टन्सची परिस्थिती पूर्वपदावर आणण्यास मदत होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT