इनर इंजिनिअरिंग  sakal
myfa

इनर इंजिनिअरिंग : मानव जातीचे खरे कल्याण

तुम्ही केवळ एक चांगली व्यक्ती असणे पुरेसे नाही. तुम्हाला या जगात राहायचे असेल, तर तुम्ही सक्षम असणेही गरजेचे आहे.

सकाळ वृत्तसेवा

प्रश्न : मला यशस्वी जीवन जगायचे आहे, मला शांती हवी आहे आणि मला एक शांततामय जग निर्माण करण्यास मदत करावीशी वाटते. माझ्यासाठी मी केवळ एक चांगली व्यक्ती बनणे, पुरेसे आहे का?

सद्‌गुरू : तुम्ही केवळ एक चांगली व्यक्ती असणे पुरेसे नाही. तुम्हाला या जगात राहायचे असेल, तर तुम्ही सक्षम असणेही गरजेचे आहे. सर्वप्रथम, तुम्ही चांगली व्यक्ती आहात असे, तुम्हाला कशामुळे वाटते? तुमच्या अवती-भोवती असणारी दहा माणसे काही ना काही कारणास्तव चांगली नाहीत आणि त्यांच्या तुलनेत तुम्ही अधिक चांगले आहात असा निष्कर्ष तुम्ही काढत आहात. तुम्ही या जगातील सर्वोत्तम व्यक्ती आहात, असा निष्कर्ष तुम्ही काढला असल्यास त्याचा अर्थ, तुमच्या मनात, या पृथ्वीतलावर इतर कोणीही व्यक्ती चांगली नाही, तुम्हीच ती एकमेव व्यक्ती आहात अशी भावना आहे.

तुम्ही चांगले आहात याचा जितका अधिक विचार तुम्ही कराल, तितके अधिक इतर कोणीही चांगले नाही, असे तुम्हाला वाटू लागेल. कोणीही चांगले नसल्यास तो नैतिकतेचा प्रश्न नसून, मूर्खपणाचा आहे. इतर कोणीही चांगले नाही, असा विचार करायची सुरुवात करणे हे मानसिक विकृतीचे पहिले लक्षण आहे. त्यामुळे तुम्ही चांगली व्यक्ती असण्याची आवश्यकता नाही. तुमच्या आयुष्यात, तुमचे आंतरिक स्वरूप जर  शांत, प्रेमळ आणि आनंदी असेल, तर तेवढे पुरेसे आहे. चांगले ‘म्हणवून घेणारे काही लोक साधे हसूसुद्धा शकत नाहीत. त्यांचा स्वभावच तसा बनलेला असतो. का माहिती आहे का तुम्हाला? कारण त्या खूप चांगल्या व्यक्ती असतात. अशा चांगुलपणाचा काय उपयोग आहे? तर, आता अंतर्मनात डोकावून, मनुष्याचे खरे कल्याण कसे साधायचे ते शोधण्याची वेळ आलेली आहे.

तुमच्या स्वतःच्या जीवनाच्या अनुभवामधून तुम्हाला हे स्पष्ट दिसेल, की तुम्हाला खरे कल्याण हे केवळ तुम्ही तुमच्या अंतरंगात बदल घडवून आणले तरच प्राप्त होईल. तुमच्या जीवनाची गुणवत्ता, तुमची वेशभूषा, तुमची शैक्षणिक पात्रता, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी, किंवा बँकेत किती रक्कम तुम्ही साठवली आहे यावरून निश्चित केली जात नाही. या क्षणी, केवळ अंतर्मनातून तुम्ही किती शांत आणि आनंदी आहात यावरून तुमच्या जीवनाची गुणवत्ता ठरते. तुमच्या अंतर्मनात परिवर्तन घडून आले, तरच तुम्हाला खरे कल्याण प्राप्त होईल.

योग आणि ध्यान या विज्ञानाच्या अशा बाजू आहेत, ज्या तुमचे अंतर्मन हाताळतात, ज्यामध्ये अंतर्मनात योग्य वातावरण निर्मिती करण्याकडे लक्ष केंद्रित केले जाते, ज्यामुळे तुम्ही एक आनंदी आणि शांत जीवन जगू शकता. त्यामुळेच प्राथमिक गोष्ट ही आहे, की ‘मनुष्यजातीचे कल्याण’ हे जर तुमचे कार्यक्षेत्र असेल, तर तुम्ही स्वतःकडे आधी लक्ष्य द्या. तरच तुम्ही मानवतेच्या कल्याणासाठी काहीतरी ठोस आणि स्थायी कामगिरी बजावू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT