चेतना तरंग  sakal
myfa

चेतना तरंग : खोटी सुरक्षितता काय कामाची?

खोटी सुरक्षितता... सुरक्षिततेची खोटी भावना तुमच्या विश्वासाला टिकू देत नाही. तुमची सुरक्षिततेबद्दलची भीती जेव्हा तुम्ही सोडून द्याल, तेव्हाच तुमचा विश्वास दृढ होतो. खोटी सुरक्षितता म्हणजे चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवणे.

श्री. श्री. रविशंकर

खोटी सुरक्षितता... सुरक्षिततेची खोटी भावना तुमच्या विश्वासाला टिकू देत नाही. तुमची सुरक्षिततेबद्दलची भीती जेव्हा तुम्ही सोडून द्याल, तेव्हाच तुमचा विश्वास दृढ होतो. खोटी सुरक्षितता म्हणजे चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवणे. नोकरी असणे, घर असणे, मित्र असणे आदी गोष्टी केवळ सुरक्षिततेचे आभास निर्माण करतात.

या सर्व ऐहिक गोष्टींची सुरक्षितता असूनदेखील विश्वास अथवा श्रद्धा नसेल, तर तुम्ही भयामध्येच जगत राहाल. जेव्हा तुम्ही अशा सुरक्षिततांची कुंपणे तुमच्या जीवनाभोवती उभी करता, तेव्हा तुम्ही श्रद्धेला मात्र दूर ठेवता. श्रद्धा ही तुमची खरी सुरक्षितता आहे. श्रद्धा तुम्हाला परिपूर्ण करते. तुमचे पैसे बँकेमध्ये किंवा तुमच्या खिशात ठेवा. ते तुमच्या मनामध्ये ठेवू नका. तुमचे घर, तुमचे मित्र, तुमचे कुटुंब हे सारे त्यांच्या नेमलेल्या जागीच योग्य आहेत, त्यांना तुमच्या मनात ठेवू नका. तुमच्या मनाचा ताबा घेऊ पाहणाऱ्या सर्व भौतिक वस्तूंना तुम्ही मनातून हाकलून लावा.

तुमचे शरीर या जगाचे आहे

तुमचा आत्मा ईश्वराचा आहे

ईश्वर हीच तुमची खरी सुरक्षितता आहे.

तुमच्या गरजेच्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणारच आहेत, याची जाणीव असणे म्हणजे श्रद्धा. ईश्वराला त्याचे काम करू देण्याची संधी देणे म्हणजेच श्रद्धा.

सत्संगानंतर...

सत्संगानंतर वर्णाच्या घरी जाण्यासाठी कारमध्ये बसताच कुमी म्हणाली, ‘‘जरा दूरच्या मार्गाने घरी जाऊ या!’’ गुरुजी उत्तरले, ‘‘मी स्वगृही परतण्याचा तुमचा प्रवास छोटा करू पाहतो आहे आणि तुम्हाला मात्र दूरचा रस्ता हवा आहे!’’

एके दिवशी स्कॉटने आपल्या परिचयातील ऐंशी लोकांना गुरुजींचे भाषण पहिल्यांदाच ऐकण्यास निमंत्रण केले. ते लोक आले खरे, पण त्या दिवशी गुरुजी एक शब्दही बोलले नाहीत. त्याऐवजी ते खुणांच्या भाषेत (त्यांची स्वतःची आवृत्ती!) पूर्ण वेळ बोलले. हा प्रसंग खूपच विनोदी होता. ‘श्री श्रीं’ची अंतर्ज्ञानातून आलेली खुणांच्या भाषेची समज पाहून तेथील बहिऱ्या लोकांच्या डोळ्यांत पाणी तरळले.

डेव्हिड म्हणाला, ‘‘गुरुजी, तुम्ही सदा सर्वकाळ प्रवास करीत असता. इतके सारे कार्य करीत राहता. एका महिन्यात तुम्ही वीस देशांचा प्रवास केलात! तुम्ही कधी सुट्टी घेता का?’’ डोळे मिचकावत ‘श्री श्री’ उत्तरले, ‘हो, दोन जन्मांच्या दरम्यान!’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

SCROLL FOR NEXT