sadguru 
myfa

Video : डिप्रेशनवर मात करण्यासाठी सद्गुरू सांगतात....

सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन

वैद्यकीयदृष्ट्या नैराश्याने ग्रासलेल्या लोकांची संख्या खूपच कमी आहे. इतर बहुतेक प्रकरणात नैराश्य हे स्वनिर्मित आहे. तुमच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, म्हणून तुमची मनःस्थिती निराश होते. यात नक्कीच शारीरिक, रासायनिक प्रक्रिया सामील आहे. प्रत्येक गोष्टीला रासायनिक आधार आहे, पण तुम्ही  मानसिक सतर्कता आणि जागरूकतेच्या एका विशिष्ट स्तरावर राहिल्यास तुमची रासायनिक प्रक्रिया आपोआप सुरळीत कार्य करत राहील. पण सध्या तुमच्याकडे सतर्कतेची पातळी टिकवून ठेवण्याची क्षमता नाही. आत्ता शेअर बाजारात उदासीनता आली तर बरेच लोक निराश होतील. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी त्या पैशाला कधी हातही लावला नसेल, इतकेच की दररोज ते भाववाढीचा वर जाणारा आलेख पाहत असतात. तेव्हा त्यांचा मूडसुद्धा चढत्या दिशेने जात होता. आता त्यांना तो घसरताना दिसतो आहे, म्हणून त्यांचा मूडसुद्धा खराब होतोय, म्हणजे याचा अर्थ, गोष्टी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे घडत नाहीयेत.

‘नैराश्य’ हा शब्द मनाच्या संदर्भात नव्हे, तर मूडच्या संदर्भात वापरला जातो. म्हणजे मनातील विचारांचे थैमान नियंत्रणाबाहेर गेले आहे. मानसिक-वैचारिक क्रिया कमी झाल्या आणि अधिक जागरूक झाल्यास अत्युत्तम. पण इथे फक्त मूड निराश आहे. मानसिक विचारांची क्रिया प्रत्यक्षात नियंत्रणाबाहेर जात आहे, पूर्वीपेक्षा खूपच जास्त. लोक अनेक प्रकारे नैराश्य निर्माण करू शकतात. तुम्ही त्यांना मौल्यवान वाटणारी गोष्टी काढून घेतल्यास त्यांची मनोदशा निराश होईल.

श्रीमंतांची शोकांतिका
श्रीमंत लोकांची शोकांतिका म्हणजे त्यांच्याजवळ सर्व काही आहे, पण खरे पाहता त्यांच्याकडे काहीच नाही. एक प्रकारची उदासीनता त्यांच्यात घर करू लागली आहे. तुम्ही भारतातील एखाद्या खेड्यात गेल्यास तुम्ही पाहाल, लोक दारिद्र्यात असतील पण त्याचे चेहरे आनंदी दिसतील. कारण त्यांना आशा आहे, उद्या सर्व काही सुरळीत होईल. वैभवसंपन्न समाजात ती आशा नाहीशी झाली आहे. त्यांनी जेवण, गाडी-बंगला, कपडे, अशा सगळ्यांची पुरेपूर तजवीज केली आहे, पण त्यांना वाटते काहीतरी चुकतेय. पण ते काय हे मात्र त्यांना माहीत नाही. समृद्ध समाजात, बाहेरचे सर्व काही सुरळीत केलेले असते, आत मात्र गोंधळ असतो. आपण आध्यात्मिक प्रक्रिया म्हणतो ते  इतकंच आहे ः तुमच्या अस्तित्वाचा आंतरिक पैलू उत्तमरीत्या हाताळत, आयुष्याच्या भौतिक गोष्टींची तजवीज करणे. तुम्ही ही न केल्यास तुमच्यापाशी सर्व काही असेल आणि तरीही तुमच्याकडे काहीही असणार नाही...

सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT