हेल्दी फूड : तरच मधुमेहात वजन नियंत्रण शक्य! sakal
myfa

हेल्दी फूड : तरच मधुमेहात वजन नियंत्रण शक्य!

शौमा मेनन

आपण मागील भागात पाहिलेल्या मधुमेह आणि वजन या विषयावर अधिक माहिती घेऊयात. आपण मधुमेहामुळे वजन वाढू नये यासाठी काय करावे या संदर्भातील काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊयात. मधुमेहामध्ये इन्शुलिनचे उपचार घेणे आणि वजन वाढण्याचा काय संबंध आहे, हे आपण मागील भागात जाणून घतले. या काळात वाढलेले वजन त्रासदायक ठरते, कारण मधुमेह नियंत्रणामधील वजनावर नियंत्रण राहणे हा महत्त्वाचा भाग असतो. यातील आनंदाची बातमी म्हणजे, इन्शुलिन घेत असतानाही वजन नियंत्रित ठेवता येते.

इन्शुलिन आणि वजनाचा संबंध

तुम्ही इन्शुलिन घेतल्यामुळे ग्लुकोजला तुमच्या पेशींमध्ये प्रवेश करणे शक्य होते व त्यामुळे तुमच्या शरीरातील ग्लुकोजची पातळी कमी होते. मधुमेहावरील उपचारांचे ध्येय हेच असते. मात्र, तुम्ही अपेक्षित वजन राखण्याच्या तुलनेत व तुमच्या हालचालींपेक्षा अधिक प्रमाणात कॅलरीज घेतल्यास तुमच्या पेशींना अधिक प्रमाणात ग्लुकोज मिळते. तुमच्या पेशींनी न वापरलेले ग्लुकोज फॅटच्या रूपात साठायला सुरवात होते.

तुम्ही आठवड्यातील सर्व दिवस योग्य आहार घेणे आणि शारीरिक श्रमाची कामे करीत राहणे अनावश्‍यक वजन न वाढण्यासाठी आवश्‍यक आहे. यासाठी तुम्हाला खालील टिप्स कामी येतील

  • तुम्ही घेत असलेल्या कॅलरीज मोजा. कमी कॅलरीज असलेले पदार्थ व पेये घेतल्यास वजन नियंत्रणात राहते.

  • तुमच्या फ्रिजमध्ये विपुल प्रमाणात फळे, भाज्या व संपूर्ण धान्यांचा साठा करा.

  • प्रत्येक जेवणाचे नियोजन करताना त्यात स्टार्च, फळे, भाज्या प्रथिने आणि फॅट्सचे प्रमाण योग्य असेल, हे पाहा. तज्ज्ञ जेवणामध्ये अर्धा भाग स्टार्च नसलेल्या भाज्या, एक चतुर्थांश भाग प्रथिने व उरलेल्या एक चतुर्थांश भाग स्टार्ट असलेले भातासारखे पदार्थ किंवा मका आणि मटारासारख्या भाज्या घेण्याचा सल्ला देतात.

  • प्रथिनांचे प्रमाण कमी करा, अतिप्रमाणात कॅलरीज असलेली पेये घेण्यापेक्षा पाणी प्या. तुमच्या डॉक्टर अथवा आहारतज्ज्ञांशी बोलून आहाराचे नियोजन करा.

  • उपवास करू नका. जेवण टाळून कॅलरिजचे प्रमाण कमी करू नका. तुम्ही जेवण टाळता, तेव्हा पुन्हा खाताना खूप भूक लागलेली असल्याने चुकीचा आहार निवडता. जेवण टाळल्याने व त्याचवेळी इन्शुलिनचा डोस त्याप्रमाणात न बदलल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण खूप कमी होऊ शकते.

  • दररोज व्यायाम करा. त्यातून तुमच्या शरीरातील कॅलरीज जाळल्या जातील. चालणे, सायकल चालवणे, वॉटर एरोबिक्स, नाचणे किंवा बागकाम करणे यांसारख्या गोष्टी आठवड्यात दररोज करा. त्याचबरोबर आठवड्यातून दोनदा स्नायूंना बळकटी देणारे व्यायाम नक्की करा. हे करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

पुढील गोष्टी टाळाच

  • व्यायाम न करणे.

  • विचार न करता व टीव्हीसमोर बसून जेवण करणे.

  • अल्कोहोल व कॉफीसारख्या गोड पेयांचे सेवन.

  • नाश्‍ता न करणे.

  • जेवणाच्या वेळा न पाळणे.

  • ताटात अनेकदा वाढून घेणे.

  • साखर, पांढरा ब्रेड अधिक प्रमाणात खाणे व प्रथिनांचे प्रमाण कमी ठेवणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : पेट्रोल- डिझेलचे दर पुन्हा वाढणार? इराण-अमेरिका संघर्ष भडकला; होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची इराणची घोषणा

Pune: रेंजहिल्स परिसरात ज्येष्ठ महिलेचा एकाकी अंत; परदेशात स्थायिक मुलाकडून पाचव्या दिवशी अंत्यसंस्कार

Telangana Crime: तेलंगणात आरोपीकडून सामूहिक हत्याकांड; पत्नी व दोन मुलांसह सहा जणांचा खून; हल्लेखोर राजकुमार फरार

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेतील शोधमोहीम ८३ तासांनी संपली; अखेरच्या बेपत्ता कामगाराचाही मृतदेह सापडला, मृतांचा आकडा ९ वर

Kalamba Pothole Death : कोल्हापुरात खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! नातेवाइकांनी थेट खड्ड्यात मृतदेह ठेवून नोंदवला महापालिकेचा निषेध; सोनार काम करणाऱ्या कुटुंबाचा हरपला आधार

SCROLL FOR NEXT