Sonali-Kulkarni 
myfa

माझा फिटनेस : व्यायामाचा ‘धुरळा’ उडवा

सोनाली कुलकर्णी

तुम्ही काय खाता, किती जेवता, किती आराम करता, किती झोप घेता या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. उत्तम आहार, वेळेवर झोपणं व वेळेवर उठणं या गोष्टीही गरजेच्या आहेत. त्यासाठी प्रत्येकानं आपला दिनक्रम आखलाच पाहिजे.

तुझ्या दृष्टीने वेलनेस म्हणजे काय?
सोनाली -
 आपली दररोजची जीवन जगण्याची पद्धती म्हणजेच ‘वेलनेस’ होय. यामध्ये आपण फिट राहणे खूपच गरजेचे आहे. खरंतर हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटकच आहे. आरोग्य चांगलं असलं, तरच आपलं आयुष्य सुंदर राहू शकतं. त्यामध्ये कोणतीही तडजोड नसावी. आपण आपलं आरोग्य तंदुरुस्तच ठेवावं अन् हेच आपलं ध्येय असलं पाहिजे.

तुझ्या आरोग्याचा मंत्र?
सोनाली -
 खरंतर प्रत्येकानं स्वतःसाठी स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढणं गरजेचं आहे. तुमचा आहार, व्यायाम आणि मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याचबरोबर तुम्ही काय खाता, किती जेवता, किती आराम करता, किती झोप घेता या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. उत्तम आहार, वेळेवर झोपणं व वेळेवर उठणं या गोष्टीही गरजेच्या आहेत. त्यासाठी प्रत्येकानं आपला दिनक्रम आखलाच पाहिजे. कलाकारांचं वेळेचं गणित नेहमीच बिघडत असतं. अनेकदा चित्रीकरणामुळं कधी लवकर उठावे लागते तर कधी रात्री उशिरापर्यंत जागावं लागतं. अनेकदा प्रवासही खूप करावा लागतो. कधीकधी १२ तासही चित्रीकरण चालतं. अशा वेळी सर्वच गोष्टींचं गणित बिघडतं. त्यामुळं आम्हाला सर्व गोष्टींची उत्तमपणे आणि वेळेवर सांगड घालावी लागते. हाच माझ्या उत्तम आरोग्याचा मंत्र आहे.

आरोग्याची गुरुकिल्ली काय?
सोनाली -
 माझा आहार साधासुधा, घरगुती असतो. खरंतर हीच माझ्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. मला चित्रीकरण व विविध कार्यक्रमांसाठी खूप प्रवास करावा लागतो. मात्र, प्रत्येक वेळी माझी आईच मला जेवण बनवून देते. माझ्या दररोजच्या आहारामध्ये भाजी-भाकरी, ताक, दही, हातसडीचा भात, सॅलड या गोष्टी असतात. ज्या गोष्टी खाऊन आपण लहानाचे मोठे झालेलो असतो, त्याच गोष्टी आपण खाल्ल्या तर त्याचा चांगला परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. डॉ. मृदूल पटवर्धन या मला आहाराचा सल्ला देतात आणि मी त्यानुसारच आहार घेते. त्यांनीच मला मातीतील तयार होणारे खाद्यपदार्थ घेण्याचा सल्ला दिला आहे. खरंतर हे नैसर्गिक धान्यच आपल्या आरोग्यासाठी अन् शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. बाहेरील पदार्थ पाहून ते खाऊ नयेत. तसंच डाएटही करू नये.
(शब्दांकन - अरुण सुर्वे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: स्कूल बसचालकाचा निष्काळजीपणा! बीडमध्ये अपघात; रस्ता ओलांडताना विद्यार्थिनीला दुचाकीची जोराची धडक, मुलगी जखमी

Mumbai News : पर्यटनस्थळाचा प्रचार हा एकमेव उद्देश; असुरक्षित कृतींना कोणतेही प्रोत्साहन नाही – पर्यटन विभाग

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

SCROLL FOR NEXT