चेतना तरंग : तीन प्रकारचे प्रेम sakalNews
myfa

चेतना तरंग : तीन प्रकारचे प्रेम

प्रेमाचे तीन प्रकार आहेत. एक तर आकर्षणातून निर्माण होणारे प्रेम, दुसरे घनिष्ठतेतून येणारे प्रेम आणि तिसरा प्रकार दैवी प्रेम

श्री श्री रविशंकर, प्रणेते आर्ट ऑफ लिव्हिंग

प्रेमाचे तीन प्रकार आहेत. एक तर आकर्षणातून निर्माण होणारे प्रेम, दुसरे घनिष्ठतेतून येणारे प्रेम आणि तिसरा प्रकार दैवी प्रेम. आकर्षणातून निर्माण होणारे प्रेम फार काळ टिकत नाही. एकमेकाला ओळखत नसताना तुम्ही एकमेकात गुंतता, ते आकर्षणातून... पण हळू हळू तुम्ही जेव्हा एकमेकांना अधिक ओळखू लागता, तेव्हा आकर्षण कमी होत जाते आणि एक प्रकारचा कंटाळा येऊ लागतो. हेच बऱ्याच लग्नांमध्ये घडते. अशा प्रकारचे प्रेम विझत जाते आणि जाताना भय, अनिश्चितता, असुरक्षितता आणि दुःखाची भावना ठेवून जाते.

जे नेहमीच्या घनिष्ठ संबंधातून निर्माण होते, ते प्रेम वाढत जाते. अशा प्रेमात तुम्ही स्वस्थ असता. जसे एखाद्या जुन्या मित्राबरोबर तुम्ही सहजपणे वावरू शकता आणि एका अज्ञात इसमाबरोबर अस्वस्थ असाल. पण अशा प्रकारच्या प्रेमामध्ये खूप उत्साह, थरार आणि ते धगधगते चैतन्य असत नाही.

या दोन्ही प्रेमप्रकारांपेक्षा दैवी प्रेम उच्च पातळीचे असते. दैवी प्रेम हे नेहमी नवे, ताजे असते. आपण जितके नजीक येत जाऊ... तेवढी या प्रेमाची खोली आणि यातले नावीन्य वाढत जाते. दैवी प्रेमात दिलासा असतो, समाधान असते. एकमेकांची चांगली ओळख झाल्यावरही उत्साह आणि नावीन्य टिकून असते.

भौतिक प्रेम महासागरासारखे विशाल असू शकते, पण सागरालाही तळ असतोच. दैवी प्रेम आकाशासारखे असते, असीम, अनंत. सागराच्या तळातून भरारी घ्या आणि विस्तीर्ण आकाशात झेप घ्या. आणखी काही जाणायचे आहे का दैवी प्रेमाबद्दल? मग नारद भक्ती सूत्रांवरील व्याख्याने ऐका.

तप आणि तपस

आदिचुनचुनागिरी आश्रमास भेट देण्याच्या समयी तेथील मुख्य स्वामींना ‘श्री श्री’ म्हणले, ‘‘मला लवकर बंगळूर आश्रमात परतायला हवे. तिथे भाविक माझी वाट पाहात आहेत.’’ स्वामी उत्तरले, ‘‘घाई करू नका. त्यांना प्रतीक्षा करू द्या. जगाची प्रतीक्षा करणे हे तप आहे, तर गुरूची प्रतीक्षा करणे हे तपस.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT