हसण्यासाठी जगा : जाग आनंदाची, मनाच्या प्रसन्नतेची!  sakal media
myfa

हसण्यासाठी जगा : जाग आनंदाची, मनाच्या प्रसन्नतेची!

लहान मूल जन्माला येतं. हवं तेव्हा झोपतं. हवं तेव्हा उठतं. ते मूल शाळा-कॉलेजमध्ये जातं तेव्हा ठरलेल्या वेळेला उठण्याची गरज निर्माण व्हायला लागते

मकरंद टिल्लू

लहान मूल जन्माला येतं. हवं तेव्हा झोपतं. हवं तेव्हा उठतं. ते मूल शाळा-कॉलेजमध्ये जातं तेव्हा ठरलेल्या वेळेला उठण्याची गरज निर्माण व्हायला लागते. ऑफिसमध्ये काम करणारी व्यक्ती ऑफिसच्या वेळेनुसार झोपण्या उठण्याच्या वेळा बदलते. झोपेतून तुम्ही कसे उठता, त्यानंतर कसे वागता, त्यावर तुमच्या दिवसाची दिशा ठरते.

  • सकाळी उठल्यानंतर आजूबाजूला रेडिओवर एखादं गाणं सुरू असतं. ‘खुश है जमाना आज पहिली तारीख है...’. ते सकाळी ऐकल्यावर दिवसभर तीच ओळ मनात घोळत राहते. सकाळी उठल्या उठल्या एखाद्या व्यक्तीने चिडचिड करायला सुरुवात केल्यास त्याचा पूर्ण दिवस चिडचिड करण्यात जातो. असं म्हणतात ‘दिवसातील पहिला तास, दिवस कसा जाईल’ हे ठरवतो.

  • ‘अनेक लोकांचा अत्यंत आवडता खेळ कोणता?’ असं विचारलं, तर त्याचं उत्तर म्हणजे ‘रात्री गजर लावणं . सकाळी वाजल्यावरती बंद करणं. त्यानंतर ‘दहा मिनिटांनी उठतो’ असं स्वतःच स्वतःला सांगणं.’ हा खेळ दररोज खेळल्यामुळे त्याचं सवयीत रूपांतर होतं. ... आणि सकाळी वेळेवरती उठण्याऐवजी, वेळ काढून झोपण्याकडं कल वाढतो! याऐवजी झोपतानाच हवं तर दहा मिनिटं उशिराचा गजर लावा!! पण गजर वाजला रे वाजला की ताबडतोब उठा.

  • दररोज लोकं इतके दमलेले असतात, की सकाळी उठताना आंबट चेहरा करून उठतात. हीच लोकं पिकनिकला जायचं असल्यास गजर वाजल्या वाजल्या उत्साहाने उठतात. दुसऱ्या दिवशी कोणती आनंदाची गोष्ट करायची आहे याचा रात्री झोपताना विचार करा. ती गोष्ट वहीवर लिहा. दुसऱ्या दिवशी उठल्यावर ती गोष्ट आठवा. शरीरातल्या आळसावर मनातला उत्साह मात करेल.

  • सकाळी जाग आल्यानंतर अनेक लोकं बंद डोळ्यानं गादीवरती हातानं चाचपडत मोबाईल शोधतात. एक डोळा उघडून पहिल्यांदा इंटरनेट ऑन करतात. मोबाईलवरती मेसेज, बातम्या किंवा ‘आदल्या दिवशी टाकलेल्या सोशल मीडियातील पोस्टला किती लाइक आले?’ हे बघतात. मोबाईल वरती दररोज सकाळी उठून इतर लोक काय करतात हे पाहण्याऐवजी स्वतः काय करायचं यावर जास्त लक्ष देऊया. सकाळचा पहिला तास यापैकी कोणतीही गोष्ट करू नका.

  • गादीवर उठून बसल्यावर स्मितहास्य करा. नंतर तर श्वास सोडत मूक हास्य करा. दिवसाची सुरुवात हसून केली तर दिवस प्रसन्न जातो.

  • नेहमी दात उजव्या हाताने घासत असाल तर मधूनच डाव्या हाताने घासून बघा. नेहमीपेक्षा वेगळ्या रीतीने गोष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपला मेंदू तरतरीत होतो.

  • सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्या. ऑक्सिजनची पातळी वाढण्यासाठी व्यायाम करा, मॉर्निंग वॉकला जा, हास्यक्लबला जा.

  • एखाद्या झाडाला स्पर्श करून निसर्गाचा आनंद घ्या. प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घेता येत नाही. पण त्यांच्या अस्तित्वामुळे आपलं आयुष्य सुखकर होतं. दररोज सकाळी मनामध्ये अशा गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.

  • दररोज सकाळी किमान पंधरा मिनिटं एखादा सकारात्मक लेख वाचा, त्यावर किमान पाच मिनिटं तरी पुन्हा विचार करा. अन्न चावून खातो त्याचप्रमाणे सकारात्मक विचारांचं सार काढल्यास मनाला आधार येतो..

  • दररोज मोबाईलची बॅटरी चार्ज करतो, तशीच दररोज सकाळी मनाची बॅटरी चार्ज करूया!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT