योगा लाइफस्टाईल : प्रत्यक्षानुमानाअगमा : प्रमाणानि sakal media
myfa

योगा लाइफस्टाईल : प्रत्यक्षानुमानाअगमा : प्रमाणानि

तुमचा तुमच्या अनुभवाशी थेट मुकाबला म्हणजे प्रत्यक्षा. यामध्ये कोणीही मध्यस्थ, माध्यम किंवा एजंट नसतो

वसुंधरा तलवारे

प्रत्यक्षा - थेट बोध

अनुमाना - तार्किक कारणमीमांसा

अगमाः - धर्मग्रंथ

प्रमाणानि - योग्य माहिती

योग्य ज्ञानाचे तीन स्रोत आहेत. थेट बोध (प्रत्यक्षा), तार्किक कारणमीमांसा व जागृत करणारे शब्द (अगमाः)

तुमचा तुमच्या अनुभवाशी थेट मुकाबला म्हणजे प्रत्यक्षा. यामध्ये कोणीही मध्यस्थ, माध्यम किंवा एजंट नसतो. तुम्हाला एखादी गोष्ट थेट समजते, तेव्हा तिचे सर्व पैलूही तुम्हाला लगेचच समजलेले असतात. ही गोष्ट घडल्यानंतर तुम्हाला सत्य उमगते. आता तुमच्या बाबतीत कोणतीही खोटी गोष्ट घडूच शकत नाही!तुम्हाला सत्य गवसल्यानंतर, तुम्ही सत्याच्या अगदी मुळापर्यंत गेल्यानंतर तुमच्या मनात कोणताही भ्रम उरत नाही. त्यामुळेच जागृत व्यक्ती कधीही स्वप्न पाहात नाही. त्यांना कधीही फसवले जाऊ शकत नाही किंवा भ्रमात ठेवता येत नाही. तुम्ही स्वप्न पाहात, तेव्हा तुमची सावधानता लोप पावते. तुम्ही जेवढे जागृत राहाल, तेवढी तुम्हाला कमी स्वप्ने पडतील. पूर्ण जागृत राहिल्यास स्वप्नेच पडणार नाहीत.

ज्ञानाचा दुसरा स्रोत आहे अनुमान. हा प्रत्यक्ष अनुभवाइतकाच महत्त्वाचा आहे. कारण, तुम्हाला आता तरी अंतरात्मा आहे किंवा नाही हे माहिती नाही. तुमच्या आतमध्ये नक्की काय चालू आहे याचे थेट ज्ञान तुम्हाला नाही. या परिस्थितीत काय करायचे? याच्या दोन शक्यता आहेत. तुम्ही अंतरात्मा आहे हे स्पष्टपणे नाकारा. हेच चार्वाकाने किंवा पश्चिमेकडे इपिक्युरस, मार्क्स एंजल्स व इतरांनी केले. पतंजली म्हणतात की, अनुमान हा योग्य ज्ञानाचा दुसरा मार्ग आहे. योग्य तर्क, योग्य शंका आणि योग्य युक्तिवाद तुम्हाला खऱ्या ज्ञानाच्या दिशेने घेऊन जातात. उदा. तुम्ही विश्वाच्या पसाऱ्याकडे पाहता, तेव्हा तुम्हाला देव असेल यावर विश्वास बसत नाही. मात्र, तुम्ही त्याचे अस्तित्व नाकारूही शकत नाही. एका साध्या अनुमानातून तुम्हाला समजू शकते, की विश्व ही एक व्यवस्था आहे, त्यात सुसंगती आहे, त्याचा एक आराखडा आहे. विश्वाच्या आराखड्याची वैशिष्ट्यपूर्णता विज्ञानही नाकारत नाही. उलट, विज्ञान विश्वात दडलेले विविध नियम शोधून काढण्याच्या मागे लागलेले आहे. पतंजलींच्या मते, अनुमानातून योग्य ज्ञानाच्या दिशेने प्रवास सुरू करता येतो, मात्र ते अनुमान अचूक असायला हवे. तर्क दुधारी तलवारीप्रमाणे घातक आहे. तुम्ही तर्क चुकीच्या पद्धतीनेही वापरू शकतो व त्यातूनही निष्कर्षापर्यंत पोहचू शकता. अनुमान अशी विचारपद्धती आहे, ज्याद्वारे विकास साधला जातो. तेव्हाच अनुमान योग्य ज्ञानाचा स्रोत बनतो.

ज्ञानाचा तिसरा स्रोत सर्वाधिक सुंदर आहे - तुम्हाला जागृत करणारे धर्मग्रंथांतील शब्द, बोध. या तिसऱ्या स्रोताबद्दल अनेक वाद आहेत. पतंजली म्हणतात, धर्मग्रंथांतून तुम्हाला थेट अनुभूती झाल्यास योग्य आहे. तुम्ही त्यातून योग्य अनुमान काढल्यासही तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोचाल. मात्र, काही गोष्टी अशा आहेत ज्यांपासून तुम्ही कोणताही अनुमान काढू शकत नाही आणि तुम्हाला त्याबद्दल काहीही माहिती नसते. मात्र, अशी स्थिती असलेले जगात कोट्यवधी लोक आहेत. हा शोध अनादि असला, तरी तेथपर्यंत काहीजण पोचले आहेत. त्यांनी ध्येयप्राप्ती केली आहे. त्यांचे शब्दही योग्य ज्ञानाचे स्रोत आहेत. आगम म्हणजे अशा ज्ञानप्राप्ती झालेल्या व्यक्तींचे शब्द. त्यामुळेच भगवान बुद्ध किंवा येशू ख्रिस्त एखादी गोष्ट सांगतात, तेव्हा त्यांना काय म्हणायचे आहे हे तुम्हाला समजत नाही. कारण त्यांनी घेतलेला अनुभव तुम्ही घेतलेला नसतो. त्यामुळे त्याची पारख करण्याचा कोणताही मार्ग तुमच्याकडे नसतो. तुम्ही ते सिद्धही करू शकत नाही किंवा नाकारूही शकत नाही. तुम्ही त्यावर काल्पनिकपणे किंवा विज्ञानाच्या कसोटीवर जोखून विश्वास ठेऊ शकता.

योग्य ज्ञानाचे हे सर्व स्रोत तुमच्या चित्त वृत्तींचा एक भाग आहेत. ते तुमच्या चित्ताला चांगल्या अनुभवाकडून वाईट अनुभवाकडे एखाद्या लंबकाप्रमाणे झुलवत असतात. तुम्ही असे विचाराल, की योग्य ज्ञान हा वाईट अनुभव कसा असू शकतो? तुमची एखादी प्रिय व्यक्ती मरण पावली हे योग्य ज्ञान असू शकते, मात्र ते तुम्हाला दुःखी करते. बरोबर आहे ना? चित्तातील आंदोलने अशाच प्रकारे घडतात आणि मेंदूला मिळणाऱ्या माहितीनुसार ते बदलत राहतात. याबद्दल आणि ‘चित्त वृत्ती निरोध’ या भागात आपण माहिती घेतली होती. त्यामुळेच आपण आपल्या वृत्तींना शांत करण्याची गरज आहे व त्यातूनच ‘स्वरुपीअवस्थम’पर्यंत पोचायचे आहे. पुढील भागात आपण चार वृत्ती कोणत्या आहेत याबद्दल जाणून घेऊयात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हनुमंत पवार मारहाण प्रकरणी तुषार दामगुडेंसह तिघांवर गुन्हा दाखल, पिस्तुल जप्त करून घरी सोडलं; अटक का नाही? कारण समोर

Sanjay Dutt UP Election: संजय दत्त युपीतून निवडणूक लढवणार? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीचा फोटो व्हायरल

Gold Rate Today: कालच्या वाढीनंतर सोन्याच्या भावात अचानक घसरण! चांदीचीही चमक फिकी; सर्वसामान्यांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

Supreme Court: इतर मुस्लिम ओबीसींचे काय? सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा आरक्षण मागणाऱ्या वकिलाला प्रश्न

T20 World Cup: ३१ षटकार अन् ४०१ धावा... वानखेडेवर WI vs NED सामन्याने घडवला इतिहास; एकाच मॅचमध्ये ३ विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT