Nagpur Crime esakal
Nagpur_old

Nagpur Crime: धक्कादायक! नागपूरात बसमध्ये प्रवासी महिलेवर चाकू हल्ला; आरोपी फरार

सकाळ डिजिटल टीम

नागपूर: बसमधून महिला जात असताना मोटारसायकलवरून येणाऱ्या तीन युवकांनी तिच्यावर चाकू फेकून हल्ला केल्याने ती जखमी झाली. ही धक्कादायक घटना मानकापुरात शुक्रवारी (ता.३०) दुपारी घडल्याची माहिती समोर आली.

याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिघांपैकी दोघांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. सोनल ज्वालाप्रसाद श्रीवास्तव (वय ३९ रा. गोधनी रेल्वे) असे जखमीचे नाव आहे. अभिजित यादव (वय २४ रा. श्रीनगर, मानकापूर) व मोहम्मद जैद सिकंदर शेख (वय १८ रा. मानकापूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

रोहित ऊर्फ करण पुरुषोत्तम नौकरिया (वय १९) हा फरार आहे. शुक्रवारी दुपारी सोनल या ‘आपली बस’ने एलआयसी चौकातून गोधनीकडे जात होत्या. पागलाखाना चौकात बस थांबली. यावेळी तिघेही दुकानातून दारू खरेदी करून येत होते.

याचदरम्यान कोणीतरी बसमधून थुंकले. ते हल्लेखोरांच्या अंगावर पडले. त्यामुळे तिघेही संतापले. तिघांनी मोटारसायकलने बसचा पाठलाग केला. अभिजितने चाकू काढला व तो बसमध्ये फेकला.चाकू सोनल यांच्या डोक्याला लागल्याने त्या जखमी झाल्या.

तिघेही पसार झाले.

सोनल यांनी नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर सदर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

IND vs AFG 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, तरीही संघात एक बदल! भारताच्या Playing XI मध्ये कोणाची एन्ट्री?

AI Powered Cancer Diagnosis: तंबाखू, प्रदूषण की केमिकल? DNA पाहून कॅन्सरचं ‘खरं कारण’ शोधणार आता AI!

SCROLL FOR NEXT