crime esakal
Nagpur_old

Nagpur Crime: लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार

सकाळ डिजिटल टीम

कन्हान: कांद्री येथील आरोपीने एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तर रूपेश पुरे हे आरोपीचे नाव आहे.

अल्पवयीन मुलगी ही शाळेत शिकत असताना मागील वर्षीपासून कांद्री येथील रूपेश पुरे नेहमी शाळेसमोर येऊन बसत होता.

दरम्यान शाळा सुटल्यानंतर तो मुलीसोबत बोलत होता. यातून पीडित अल्पवयीन मुलीसोबत त्याची मैत्री झाली. नंतर रूपेश याने घरातील लोक कामावर गेल्यानंतर तिला आपल्या दुचाकीवर बसवून फिरायला घेऊन गेला. तिथे तिच्यासोबत बळजबरीने संबंध प्रस्थापित केले.

दरम्यान तो वारंवार तिच्यावर अत्याचार करीत होता. तसेच वारंवार भेटीत मुलीने आपण वेगवेगळ्या समाजाचे असल्यामुळे लग्न शक्य होईल काय, असे विचारल्यानंतर त्याने तिला वारंवार लग्नाचे आमिष दाखविले.

हा प्रकार मुलीच्या घरी माहीत झाल्याने तिचे आईवडिलांसोबत २२ नोव्हेंबर २०२२ रोजी कडाक्याचे भांडण झाले. भांडणातून रागाच्या भरात मुलगी रूपेशसोबत त्याच्या घरी निघून गेली. १४ जून २०२३ रोजी ती पीडित मुलगी आरोप रूपेश याच्याकडे आठ महिने राहिली.

दरम्यान रूपेश याने मुलीसोबत वारंवार संबंध प्रस्थापित केले. याच काळात मुलीच्या आईवडिलांना रूपेश याने भेटू दिले नाही,अशी मुलीची तक्रार आहे. रूपेश याला मुलगी वारंवार लग्न कर म्हणून गळ घालत होती.

मात्र, आरोपी हा वेळ मारून नेत होता. तसेच दारूच्या नशेत संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. आरोपीच्या जाचाला कंटाळून ती मुलगी आईवडिलांच्या घरी आली. यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने पीडित मुलीला मारहाण केली.

मुलीच्या आईने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केले असता तिलासुद्धा मारहाण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून आरोपी रूपेश पुरे याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात कन्हान पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT