उद्यान sakal
Nagpur_old

Nagpur :नागपूरात शंभरावर उद्यानांचा होणार कायापालट

महापालिका तीन कोटी खर्च करणार चिमुकल्यांसाठी नवी खेळणी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरातील उद्यानांची तसेच त्यातील साहित्याची दुरवस्था झाल्याबाबत ‘सकाळ’ने वृत्तमालिकेतून लक्ष वेधल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. शहरातील नासुप्रचे ५३ तर स्वतःच्या मालकीच्या ६० उद्यानांचा कायापलट करण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे. या उद्यानात नवी खेळणी लावणे, दुरुस्ती करणे, ग्रीन जिम लावणे आदी कामांवर तीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

दैनिक ‘सकाळ’ने मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यात ‘मेरी आवाज सुनो’ या विशेष उपक्रमांतर्गत शहरातील विविध उद्यानांची दुरावस्था, त्यातील चिमुकल्यांच्या खेळणीची दुर्दशा, ग्रीन जिम, वाढलेली झुडपे आदीवर प्रकाश टाकणारी मालिका प्रकाशित केली. या मालिकेतून जुना बगडगंज, चंद्रमणीनगर, त्रिमूर्तीनगर, समर्थनगर, सावरकरनगर, धंतोली एम्प्रेस मिल कॉलनीतील जोशीवाडी, वर्धा रोडवरील प्रगतीशील सोसायटी, फ्रेन्डस कॉलनी, उरुविला कॉलनी, धंतोलीतील मेजर सुरेंद्रदेव उद्यान, सीजीएचएस कॉलनी उद्यान, इंद्रप्रस्थ ले-आऊट उद्यान, पांडे ले-आऊट, रामनगर, केटीनगर उद्यानांचे वास्तव ‘सकाळ’ने मांडले.

सकाळच्या वृत्ताची मनपाकडून दखल

या मालिकेची दखल घेत महापालिका प्रशासनाने ११३ उद्यानांचा कायापालट करण्याबाबत नियोजन केले आहे. महापालिकेचा उद्यान विभाग शहरातील उद्यान व त्यातील साहित्याची दुरुस्ती किंवा नवे साहित्य लावण्यासाठी प्रस्ताव तयार करीत आहे. या उद्यानांचा महापालिका सर्वे करणार आहे.

उद्यानातील चिमुकल्यांच्या खेळण्याच्या साहित्यासाठी तीन कंपन्यांकडून दरासंबंधी कोटेशन मागविण्यात आले आहे. त्यानंतर प्रस्तावात दराचा उल्लेख करून साहित्य खरेदीसाठी निविदा काढणार असल्याचे अधिकाऱ्यांनी नमुद केले. ज्या उद्यानांमध्ये चिमुकल्यांचे साहित्य पूर्णपणे खराब झाले, तेथे नवीन घसरपट्टी, झुला, डक, सि सॉ, डबल बार, सिंगल बार आदी लावण्यात येणार आहे.

ग्रीन जिमही लावणार

काही उद्यानांमध्ये ग्रीन जिम लावण्यातच आले नव्हते तर काही उद्यानातील ग्रीन जिमची दुर्दशा झाली आहे. जिथे ग्रीन जिम नाही, अशा उद्यानात चेस्ट प्रेस, बटरफ्लाय मशीन, एअर वॉकर, रोवर, सिटींग व स्टॅंडिंग ट्विस्टर, शोल्डर बिल्डर, हॅन्ड रोलर, सिट अप बोर्ड, सिटेड पॅनल, सर्फ बोर्ड, वेव पॅनल, स्काय वॉकर, लेग प्रेस, बेंच पॅनल आदी साहित्य लावण्यात येणार आहे. तर काही ग्रीन जिमचे साहित्य दुरुस्त करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT