file photo 
नांदेड

राज्याच्या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्यासाठी 1,408 कोटींच्या निधीची तरतूद- पालकमंत्री अशोक चव्हाण

प्रल्हाद कांबळे

नांदेड : राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या सन 2021- 22 या वर्षाच्या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्यातील 206 कामांसाठी सुमारे एक हजरा 408 कोटी 93 लाख रुपयांचा निधी अर्थसंकल्पित झाला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. 

राज्याच्या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्यातील विविध कामांना भरीव निधी मिळावा, यासाठी प्रयत्न केले होते. पालकमंत्री म्हणून केलेल्या मागण्यांना अर्थमंत्री श्री. पवार यांनी भरीव तरतूद केल्याचे अर्थसंकल्पात दिसून आले आहे. 

यानुसार, नांदेड जिल्ह्यात नाबार्ड अंतर्गत 46 कांमासाठी 134 कोटी 55 लाख, राज्यमार्गाच्या 32 कामांसाठी 356 कोटी 25 लाख, प्रमुख जिल्हा मार्गाच्या 86 कामांना 488 कोटी 63 लाख, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयीन इमारतींच्या नऊ कामांसाठी 216 कोटी 38 लाख, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचारी निवासस्थानांच्या 14 कामांसाठी 41 कोटी 64 लाख, विश्रामगृहांच्या 11 कामांसाठी 47 कोटी 92 लाख, महसूल विभाग इमारती/निवासस्थानाच्या दोन कामांसाठी 11 कोटी 84 लाख, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या इमारतीच्या दोन कामांसाठी 35 कोटी 86 लाख आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या इमारतीच्या चार कामांसाठी 75 कोटी 86 लाख निधी अर्थसंकल्पित झाला आहे. 

राज्याच्या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्यातील या विविध कामांना निधीची तरतूद केल्यामुळे पुढील वर्षभरात या कामांना वेग येईल व ती लवकर पूर्ण करण्यात येतील, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये तापमान 38.2 अंशावर पोहचले

SCROLL FOR NEXT