नांदेडचे शासकिय रुग्णालय विष्णुपूरी 
नांदेड

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास 19 कोटी मंजूर

शहराच्या विष्णुपूरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एमआरआय मशिन नव्हती.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास एमआरआय मशिन उपलब्ध करुन द्यावी यासाठी अशोक चव्हाण यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. शासनाने यासाठी मान्यता दिली असल्याने एमआरआय मशिन आता लवकरच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर 19 कोटी रुपयांच्या अनुदानातून खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे आता विविध आजारांच्या निदानासाठी रुग्णांना खाजगी रुग्णालयात अधिकचे पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

शहराच्या विष्णुपूरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एमआरआय मशिन नव्हती. उपचाराची दिशा ठरवताना एमआरआय चाचण्या महत्वाच्या असल्याने रुग्णांना मेंदूचे विकार, स्नायू, मनक्याचे विकार, छाती, हृदय, रक्तवाहिन्यांच्या तपासण्यासाठी खाजगी रुग्णालयात जावे लागत होते. खाजगीतील निदान गरीब व सर्वसामान्यांना परवडणारे नव्हते. यासाठी अधिकचा पैसा लागत असल्याने सर्व सामान्य रुग्णांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत होते.

हेही वाचा - उद्योजक संजय घोडावत यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागणारा अटकेत

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा असाव्यात यासाठी अशोक चव्हाण यांनी प्रारंभीपासूनच प्रयत्न केला होता. या प्रयत्नातून आवश्यक असलेले विविध उपकरणे खरेदी केले असले तरी अद्याप एमआरआय मशिन नसल्याने या मशिनच्या खरेदीस मान्यता द्यावी अशी मागणी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सातत्याने शासनाकडे केली होती.

येथे क्लिक करा - हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा चांगला पाऊस होणार असल्याने उजनी धरण जुलैमध्ये निश्‍चितपणे भरेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला

या पाठपुराव्यास यश आले असून वैद्यकीय शिक्षण विभागाने एमआरआय मशिन खरेदीस मान्यता दिली आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2021-22 या वित्तिय वर्षात मंजूर अनुदानातून 19 कोटी रुपये एमआरआय मशिन खरेदी करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. एमआरआय मशिन खरेदीसाठी मान्यता दिल्याने या मशिनच्या खरेदीची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एमआरआय मशिनची सुविधा उपलब्ध झाल्यास सर्वसामान्य रुग्णांना विविध आजाराच्या निदानासाठी खाजगी रुग्णालयात जावे लागणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT