Corona Patients
Corona Patients Sakal media
नांदेड

नांदेड : कोरोनाचा वाढता आलेख सुरूच ... संख्या दोन हजारांच्या पार

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची(nanded corona update) संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने(nanded district) दखल घेत कोविड-१९ च्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात सुरुवात केली आहे. शनिवारी (ता.१५) जिल्ह्यात प्राप्त झालेल्या एक हजार ११८ अहवालापैकी ४२१ जणांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. शनिवारी जिल्हाभरातील शासकीय व निमशासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांपैकी ६२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९३ हजार १६३ इतकी झाली असून आत्तापर्यंत ८८ हजार २८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मागील अनेक दिवसापासून एकाही गंभीर रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे शनिवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील कोरोना(omicron varient) आजाराने मृत्यू झालेल्यांची संख्या दोन हजार ६५५ वर स्थिर आहे.

शनिवारी नांदेड वाघाळा महापालीका(nanded corporation) हद्दीत ३०७, नांदेड ग्रामीण १८, हदगाव एक, लोहा सात, हिमायतनगर एक, मुदखेड सात, किनवट चार, देगलूर सहा, मुखेड १४, नायगाव सहा, बिलोली ११, धर्माबाद एक, भोकर चार, कंधार सहा, माहूर दोन, हिंगोली दोन, परभणी सहा, वाशीम एक, पुणे एक, अमरावती एक, अकोला एक, मध्यप्रदेश एक, मुंबई एक, हैदराबाद एक, यवतमाळ एक, जालना दोन, गडचिरोली एक व पंजाब दोन असे ४२१ जणांचे अहवाल बाधित आले आहेत. विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात २८, जिल्हा कोविड रुग्णालय सहा, नांदेड महापालिका गृहविलगीकरणात एक हजार ६९७, नांदेड जिह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरणात ४७७ तर, खासगी रुग्णालयात २२ असे दोन हजार २२० बाधितांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी तीन बाधितांची प्रकृती गंभीर(corona virus ) आहे.

नांदेड कोरोना मीटर

  1. पॉझिटिव्ह - ९३ हजार १६३

  2. कोरोनामुक्त - ८८ हजार २८८

  3. मृत्यू - दोन हजार ६५५

  4. शनिवारी पॉझिटिव्ह - ४२१

  5. शनिवारी कोरोनामुक्त - ६२

  6. शनिवारी मृत्यू - शुन्य

  7. उपचार सुरु - दोन हजार २२०

  8. अतिगंभीर प्रकृती - तीन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT