अर्धापूर येथे तीन एटीएम फोडले 
नांदेड

बाप रे...! अर्धापुरात पंधरा मिनिटात एटीएम फोडून 31 लाख लंपास; पोलिस दलात खळबळ

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अर्धापूर शहरातील बसवेश्वर चौकात स्टेट बॅक आॅफ इंडियाचे एटीएम आहे.

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : अर्धापूर शहरातील गजबजलेल्या बसवेश्वर चौकातील एसबीआय बॅंकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी अवघ्या पंधरा मिनिटात फोडून 31 लाख लंपास केल्याची घटना मंगळवारी (ता. 29) पहाटे तीन वाजून 29 ते 3: 42 या वेळेत झाली आहे. या प्रकरणी अज्ञात तीन जणाविरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडले आहे. घटनास्थळी पोलिस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी भेट देवुन तपासा संदर्भात सुचना केल्या आहेत. या घटनेमुळे जिल्हात एकच खळबळ उडाली असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिस पथके तयार करण्यात आली आहेत.

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अर्धापूर शहरातील बसवेश्वर चौकात स्टेट बॅक आॅफ इंडियाचे एटीएम आहे. हे एटीएम मंगळवारी पहाटे 3: 29 ते 3: 42 च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी फोडून या एटीएममधून रोख 31 लाख लंपास केले. अज्ञात चोरटे कारमध्ये आले होते. ही चोरी तिघांनी केली असावी असा प्राथमिकअंदाज आहे. चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने मशीन फोडली आहे. हे कृत्य करणारी अतंरराज्य टोळी असावी असा प्राथमिक आंदाज आहे.

हेही वाचा - आरआरआर मध्ये एनटीआर ज्युनिअर आणि रामचरण यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.

दरम्यान घटनेचा गांभीर्य लक्षात घेवून जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधिकक्ष विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी गोपाळ रांजनकर यांनी घटनास्थळी भेट दिली. व तपासा संदर्भात सुचना दिल्या. तसेच श्वानपथक, ठसे तज्ज्ञ यांनाही पाचारण करण्यात आले होते. या पथकाने आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी बॅंक अधिका-यानी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दुपारी सुरु होती. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक जाधव हे करत आहेत. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. टी. नांदगावकर, पोलिस उपनिरिक्षक कपील आगलावे, साईनाथ सुरवसे, बळीराम राठोड, कल्याण गूळकर यांनी भेट दिली.

येथे क्लिक करा - भन्नाट आयडीया : अर्धापूरातील सुशिक्षित तरुणांने तयार केली विजेवर चालणारी सायकल

असा झाला घटनाक्रम

पोलिस पहाटे 3: 26 बसवेश्वर चौकातून गस्त घालून गेले त्यानंतर 3: 29 कारमधून अज्ञात चोरटे बसवेश्वर चौकात आले. 3: 32 वाजता एटीएममध्ये प्रवेश , पुढील दहा मिनिटात एटीएम गॅस कटरच्या ससहाय्याने फोडले. 3 : 42 ला चोरटे कारमध्ये बसून फरार झाले. हे सर्व घटनाचक्र एटीएम परिसरातील दूकानातील सिसिटीव्ही कॅमे-यात टिपले गेले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT