ST Strike Latest News Updates
ST Strike Latest News Updates sakal
नांदेड

नांदेड विभागात ३२ एसटी बस सुरू

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेड एसटी विभागातील शासकीय सेवेतील कर्मचारी पहिल्या दिवसापासून कामावर हजर होत असले तरी, चालक - वाहक अजूनही पूर्णपणे कामावर हजर झालेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील एसटी बससेवा न्यायालयाच्या निर्णयानंतरच पूर्णक्षमतेने सुरु होईल असे दिसत असले तरी, विभागातील २३१ कर्मचारी कामावर रुजू झाल्याने ३२ बसेस सुरु झाल्याने एसटी बससेवा हळूहळ पूर्वपदावर येताना दिसत आहे.(ST Strike Latest News Updates)

२६ नोव्हेंबर २०२१ पासून राज्यातील एसटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. यात नांदेड एसटी विभागातील तीन हजार २०९ कर्मचाऱ्यांपैकी दोन हजार ९०८ कर्मचारी प्रत्यक्ष संपात सहभागी झाले होते.

दरम्यान ३०१ शासकीय कर्मचाऱ्यांच्या जिवावर एसटीचा डोलारा सुरु होता. यात एकाही चालक - वाहकाचा समावेश नसल्याने एसटी एसटी सुरु धावूशकली नव्हती. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन आणि त्यानंतर बडतर्फची कारवाई सुरु झाल्यानंतर मात्र अनेक कर्मचारी कामावर परतण्यास तयार झाले असले तरी, त्यांना संघटनेच्या दबावामुळे प्रत्यक्ष कामावर हजर होता येत नव्हते.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु झाल्यापासून आजपर्यंत विभागातील ३१८ कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत. त्यामुळे निलंबन व बजतर्फची होणारी कारवाई टाळता यावी म्हणून मागील तीन महिण्याच्या कालावधीत विभागातील ६४७ कर्मचारी कामावर रुजु झाले आहेत. त्यामुळे विभागात ३२ एसटी बसेस प्रवाशांच्या सेवेत सुरु झाल्या आहेत.

विभागातील बसेसची संख्येच्या मानाने अजुन एक टक्का देखील बसेस सुरु झाल्या नसल्याचे एसटी विभागातील वरिष्ठ आधिकाऱ्यांचे म्हणने आहे. सध्या धावत असलेल्या ३२ एसटी बसेस पैकी नांदेडच्या मुख्य आगारातून ११ व देगलूर आगारातून दहा ह्या सर्वाधिक बस धावत आहेत. रविवारी (ता.१३) भोकर आणि किनवट आगारातून एकही बस धावल्याची नोंद झाली नाही.

आगार - हजर - प्रत्यक्ष आंदोलनात

  • विभागीय कार्यशाळा - चार - शुन्य

  • विभागीय कार्यशाळा - ४७ - १३०

  • नांदेड - ४६ - ४९६

  • भोकर - तीन - २१५

  • किनवट - सात - १७७

  • मुखेड - १२ - २७५

  • कंधार - ३५ - २३१

  • बिलोली - १८ - २२७

  • देगलूर - ३४ - २२८

  • हदगाव - १९ - २००

  • माहूर - सहा - ८२

असे २३१ कर्मचारी कामावर हजर तर दोन हजार २६१ कर्मचारी आजही आंदोलनात सहभागी आहेत. सध्या ३२ एसटी बसेस सुरु असून, ३१८ कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT