file photo 
नांदेड

पीक कर्जासाठी 38 हजार ऑनलाइन अर्ज

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : खरीप हंगाम सन २०२० - २१ साठी पीककर्ज घेण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी संकेतस्थळाला भेट देऊन पीककर्जाची मागणी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले होते. यानुसार चार दिवसांत जिल्ह्यातील ३८ हजार ५४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून मिळाली.

कोरोनामुळे ऑनलाइन अर्जाची मागणी
जागतिक महामारी कोविड-१९ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देशपातळीवर संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. बँकेतील गर्दीमुळे होणारा विषाणू संसर्ग टाळण्यासाठी २०२० - २१ या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यातील पीककर्ज घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी संकेतस्थळावर (ता. १७ ते २७) मे दरम्यान ऑनलाइन पीककर्ज मागणी नोंदणी करावी, असे आवाहन शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले होते.

जिल्हा अग्रणी बॅंक पाठविणार अर्ज
ही नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा अग्रणी बँकेमार्फत संबंधित बँकेकडे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. ही यादी प्राप्त झाल्यानंतर संबंधित बँक शाखेकडून पीककर्ज घेण्यास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना लघुसंदेश पाठविण्यात येणार आहे.

संदेश प्राप्त होताच बॅंकेकडे जावे
बँकेमार्फत लघुसंदेश प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बँकेने दिलेल्या तारखेस त्यांचे आधारकार्ड, सातबारा, आठ-अ, फेरफार नक्कल, पॅनकार्ड, टोच नकाशा, पासपोर्ट साईज दोन फोटो, पासबुक या कागदपत्रांसह बँकेत उपस्थित राहावे, असे सांगण्यात आले होते. यानुसार चार दिवसांत जिल्ह्यातील ३८ हजार ५४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन कर्जमागणी अर्ज दालाख केले आहेत. अंतिम पीककर्ज मंजुरी किंवा नामंजुरी बँकेच्या नियमाप्रमाणे करण्यात येईल, याची संबंधित शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रवीण फडणीस यांनी केले आहे.

दोन हजार ५३९ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट 
जिल्हास्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी आगामी खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यासाठी दोन हजार ३१ कोटी, तर रब्बीसाठी ५०७ कोटी, असे एकूण दोन हजार ५३९ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट २८ बॅंकांच्या वेगवेगळ्या शाखांना दिले आहे. या बाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शेतकऱ्यांना वेळेत कर्ज देण्याची सूचना दिली होती. 

कर्ज वाटपाचे काम रखडले
यंदा शेतकऱ्यांची पीककर्ज माफी कोरोना विषाणूच्या उपाययोजनेत लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये अडकल्याने पीककर्ज वाटपाचे काम ठप्प आहे. पीककर्ज माफीसाठी पात्र ठरलेल्या खात्यांवर कर्जमाफीची रक्कम वर्ग झाल्यानंतर त्या खात्याला नव्याने कर्ज वापट करणे सोयीचे होईल, अशा विचारात असलेल्या राष्ट्रीयीकृत बॅंकांनी चालू बाकीदार तसेच नव्याने कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्ज वाटप केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची कारवाई सुरूच! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्यामुळे परवाना रद्द

Amol Mitkari Reaction : जयंत पाटील-प्रफुल्ल पटेल-तटकरे, मुख्यमंत्री फडणवीसांना एकत्र भेटले? अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया, 'राजकारणात नवा ट्वीस्ट'

Latest Marathi News Update : मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया, पटेल-तटकरे भेटीबाबतही बोलले

Pune: फुरसुंगीतील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका; प्रशासनाचे दुर्लक्ष; तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी

Sadabhau Khot Latest Political Statement : 'सवतीचं स्वागतच, भांडीकुंडी करू लागेल'; जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाबाबत आमदार सदाभाऊ खोत यांचा खोचक टोला

SCROLL FOR NEXT