cartridges sakal
नांदेड

Nanded News : नाल्यात सापडली ४६ वर्षांपूर्वीची ४३६ काडतुसे

पावडेवाडी शिवारातील एका नाल्यामध्ये अर्धवट अवस्थेत उघडी पडलेली गंजून जीर्ण झालेली ४६ (१९७८ सालची) वर्षांपूर्वीची काडतुसे सापडली.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - पावडेवाडी शिवारातील एका नाल्यामध्ये अर्धवट अवस्थेत उघडी पडलेली गंजून जीर्ण झालेली ४६ (१९७८ सालची) वर्षांपूर्वीची काडतुसे सापडली. भाग्यनगर ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही काडतुसे ताब्यात घेतली. हा प्रकार शनिवारी (ता. १) रात्री आठला उघडकीस आला. काडतुसे याठिकाणी कशी आली, याबाबत सखोल तपासासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे.

पावडेवाडी येथील आकाश पावडे हा शनिवारी सायंकाळी मधाच्या शोधात फिरत होता. पावडेवाडी शिवारातील नाल्याकडे आला असता, त्याला काडतुसांनी भरलेला एक पट्टा आढळला. त्यानंतर त्याने तो पट्टा घरी नेऊन वडिलांना दाखविला. वडिलांनी तत्काळ भाग्यनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबविली.

पोलिसांना ‘एलएमजी’ची ३९० काडतुसे नाल्यात आढळून आली. दरम्यान, रविवारी (ता. २) सकाळीदेखील पोलिसांनी शोध घेतला असता, ४६ काडतुसे आढळून आली. पोलिसांनी सर्व ४३६ काडतुसे जप्त केली आहेत. या काडतुसांच्या फायरकॅपवर (७.६२ एमएम ओएफडी-७८ एम-८०) असा उल्लेख आहे.

दरम्यान, पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, सहायक पोलिस अधीक्षक सी.एम. कीरितिका, पोलिस निरीक्षक रामदास शेंडगे यांच्यासह दहशतवादविरोधी पथक, श्वान पथक, बीडीएस पथकाने पाहणी केली.

२० वर्षांच्या वर काडतुसे होतात निकामी

पोलिस मुख्यालयातील शस्त्रागार विभागातील अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली असता, ४६ वर्षांपूर्वी म्हणजेच १९७८ साली ही काडतुसे बनविण्यात आलेली आहेत. देशाच्या सीमेवर सैनिकांकडून या काडतुसांचा वापर केला जात होता; तसेच २० वर्षांच्या वर काडतुसे निकामी होतात, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : दहा वर्षे प्रेमसंबंध, ब्रेकअपनंतर भेटायला बोलावून भररस्त्यात प्रेयसीची हत्या, स्वत:लाही संपवलं

Yellow Rain Kolhapur : काय सांगता! कोल्हापूरच्या कागल परिसरात चक्क पिवळा पाऊस, सोशल मीडियावर Video Viral

AUS vs IND, 3rd ODI: भारताच्या Playing-XI मध्ये कुलदीप यादवला संधी, पण नितीश रेड्डीच्या न खेळण्याचं खरं काय कारण? BCCI कडून खुलासा

Whatsapp Storage Feature : स्टोरेज सतत फूल होतंय? व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलं जबरदस्त फीचर; एका क्लिकमध्ये मॅनेज करता येणार मोबाईलचा स्पेस

Healthy Life: फक्त सकाळी जिम अन् डाएट करणे पुरेसे नाही, तर हृदयरोगतज्ज्ञांच्या मते 'या' गोष्टींही ठेवल्या पाहिजे लक्षात

SCROLL FOR NEXT