nanded sakal
नांदेड

Nanded : नांदेड-बिदर रेल्वेमार्गासाठी राज्याकडून ५० टक्के निधी

मागील अनेक वर्षांपासून बहुचर्चित व प्रस्तावित नांदेड - बिदर ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठीच्या ५० टक्के वाट्याला राज्य शासनाने सोमवारी मंजुरी दिली आहे. याबाबतचे पत्र मिळाल्याची माहिती खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : मागील अनेक वर्षांपासून बहुचर्चित व प्रस्तावित नांदेड - बिदर ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठीच्या ५० टक्के वाट्याला राज्य शासनाने सोमवारी मंजुरी दिली आहे. याबाबतचे पत्र मिळाल्याची माहिती खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली.

ग्रामीण विशेषतः अविकसित भागातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळण्यासाठी निवडक प्रकल्पांत ४० ते ५० टक्के आर्थिक सहभाग देण्याचे धोरण राज्याने स्वीकारले आहे. नांदेड - बिदर या १५७.०५ किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पाचा २०१८-१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात समावेश झाला होता. रेल्वे विभागाच्या अहवालानुसार जमिनीची किंमत वगळून प्रकल्पाची एकूण किंमत दोन हजार १६२ कोटी रुपये आहेत.

महाराष्ट्रातील १००.७५ किलोमीटर लांबीसाठी एक हजार ३८७ कोटींचा खर्च आहे. जमीन अधिग्रहणाचा ११३ कोटी खर्च अंतर्भूत केल्यानंतर राज्याच्या प्रकल्पाची एकूण किंमत दीड हजार कोटी आहे. या अनुषंगाने केंद्राच्या एकूण प्रकल्प किमतीच्या ५० टक्के म्हणजेच ७५० कोटींच्या आर्थिक सहभागास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT