nanded sakal
नांदेड

Nanded News : सकल ब्राह्मण समाजातर्फे लाक्षणिक उपोषण

रणनवरे यांच्या उपोषणाला पाठिंबा : मागण्यांचे निवेदन सादर

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : विविध प्रलंबित मागण्यांसाठी जालना येथे उपोषणास बसलेले दीपक रणनवरे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल ब्राह्मण समाजातर्फे मंगळवारी (ता. पाच) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आंदोलनानंतर शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून त्यासाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात यावी, ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात यावे, प्रत्येक जिल्ह्यात ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह निर्माण करावे, मंदिरातील पुजारी व पुरोहितांना दरमहा पाच हजार मानधन देण्यात यावे, ब्राह्मण समाजातील सेवकांना मिळालेल्या इनामी जमिनी वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये करण्यात याव्यात, राज्यातील सर्व मंदिरे वंशपरंपरागत पुरोहितांकडे सुपूर्द करण्यात यावीत, शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीस पुन्हा खुल्या प्रवर्गातून संधी देऊ नये, अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या.

या आंदोलनात विश्वासशास्त्री घोडजकर, प्रवीण साले, कृष्णा जोशी, आशिष नेरलकर, निखील लातूरकर, अनिल डोईफोडे, संतोष परळीकर, बंडोपंत कुंटूरकर, सखाराम कुलकर्णी, मोहिनीराज दिवाकर, शीतल खांडील, प्रदीप देशपांडे, प्रदीप भोरे, सतीश भुरे, गोविंद चौधरी, नरेश दंडवते, गिरीश कहाळेकर, मुकुंद वाकोडकर, शशिकांत पाटील, दि.मा. देशमुख, संतोष कुलकर्णी, रवींद्र कुलकर्णी, रघुनाथ सरदेशपांडे, निलेश कुंटूरकर, अपर्णा चितळे, अर्चना शर्मा, मनीषा कुणसावलीकर आदीं समाज बांधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT