खत वापरासाठी कृषिक अॅप 
नांदेड

खताच्या अचूक मात्रासाठी गणकयंत्र; कृषी विभागाकडून कृषिक ऍप तयार

रासायनिक खतांचा कमीत-कमी व संतुलित वापर होण्याच्या दृष्टीने तसेच उत्पादन खर्च कमी करुन अधिक उत्पन्न मिळविण्याच्या उद्देशाने प्रत्येक पिकांसाठी अचूक व फायदेशीर खत मात्रा निवडणे अत्यंत गरजेचे आहे.

प्रल्हाद कांबळे/ कृष्णा जोमेगावकर

नांदेड : बारामती कृषी विज्ञान केंद्र व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित रासायनिक खताच्या शिफारस केलेल्या मात्रा मिळवण्यासाठी कृषिक हे मोबाईल ऍप विकसीत केले आहे. या गणकयंत्राचा वापर करुन शेतकर्‍यांनी पिकांना अचूक खतमात्रा द्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

रासायनिक खतांचा कमीत-कमी व संतुलित वापर होण्याच्या दृष्टीने तसेच उत्पादन खर्च कमी करुन अधिक उत्पन्न मिळविण्याच्या उद्देशाने प्रत्येक पिकांसाठी अचूक व फायदेशीर खत मात्रा निवडणे अत्यंत गरजेचे आहे. यातून जमिनीची सुपिकता वाढीस लागून अधिक उत्पन्न हाती येईल. ही अचूक खत मात्रा मिळविण्यासाठी क्लिस्ट गणिती सुत्रांचा वापर करावा लागतो. यासाठी शेतकर्‍यांना या खत मात्रा अगदी सहज सुलभ पध्दतीने कशा मिळविता यावे,यासाठी कृषिक-खत गणकयंत्र विकसीत करण्यात आले आहे.

हेही वाचा - Good News : नांदेडच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाला मिळणार नविन वसतीगृह

शेतकर्‍यांनी कृषिक गणकयंत्राच्या माध्यमातून संबंधित कृषि विद्यापीठांनी शिफारस केलेल्या विविध पिकांसाठीच्या खतमात्रा परिगणीत करण्यासाठी या

मोबाईल ऍपचा वापर करावा. त्याप्रमाणे खतांचा फायदेशीर पर्याय निवडून भरघोस उत्पन्न मिळवा असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.

यासाठी शेतकर्‍यांनी अँड्रॉईड मोबाईल फोन मधील गूगल प्ले-स्टोअर मध्ये कृषिक सर्च करुन अथवा बारकोड स्कन करुन कृषिक ऍप डाउनलोड करावे.

खत गणकयंत्राचे वैशिष्ट्ये

खत गणकयंत्रामध्ये संबंधित कृषी विद्यापीठाच्या पिकनिहाय खत शिफारशींचा समावेश आहे. जमिन आरोग्य पत्रिका आधारीत विविध पिकांसाठी शिफारस केलेली खतमात्रा, बाजारातील किंमतीनुसार प्रति एकर आवश्यक खतमात्रांच्या खर्चाची गणना, पिकांसाठी शिफारस केलेल्या खतमात्रेचे नत्र, स्फुरद व पालाश वापरासाठी विविध खतांचे पर्याय, शिफारस केलेल्या खतांच्या विभाजीत (स्प्लीट) मात्रांची गणना, सरळ व संयुक्त खतांच्या शिफारशींचे पर्याय उपलब्ध. गावनिहाय जमिन सुपिकता निर्देशांकानुसार खतमात्रांची परिगणना करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT