nanded sakal
नांदेड

Nanded News : ग्रामिण भागात कारभारणींच्या योगदानाला हवे बळ

अंगमेहनतीची अवजड कामे करुनही स्वावलंबी नाही : विक्री व्यवस्थेमध्ये व्हावा बदल

सकाळ डिजिटल टीम, सकाळ वृत्तसेवा

नांदेड : ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबातील महिला वर्षभर शेतीत राबतात. प्रसंगी अंग मेहनीतीची अवजड कामेही त्या करतात. शेतीबरोबर व्यावसायिक दृष्टिकोन बनण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, निसर्गाच्या लहरीपणामुळे, बाजारपेठांतील भावांमुळे त्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे कमी कालावधीची व कमी खर्चाची पिके घेऊन तंत्रशुद्ध शेती त्यांना करता यावी, म्हणून त्यांच्या योगदानाला बळ देण्याची गरज आहे.

खरीप असो की रब्बी हंगाम, शेतीत महिलांचे योगदान किती मोठे असते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून, किंबहुना मोठे योगदान देऊनही महिला श्रेयापासून दूरच राहत असल्याचे दिसून येते. संकटांशी आणि आव्हानांशी सामना करण्याची उपजत वृत्तीच त्यांना शेतीत काम करण्याचे बळ देत असते. शेतीशिवारात मशागतीसह काडी-कचरा वेचणे, निंदणी, कोळपणी, पेरणी, बियाणे तयार करण्यासह उत्पादन येईपर्यंत महिलांचा सहभाग अधिक असतो.

विक्री व्यवस्थेमध्ये व्हावा बदल

देशातील प्रत्येक मालावर किमान विक्रीमूल्य छापलेले असते. मात्र, शेतीमालावर कोणतेही मूल्य नसते. शेतीमालाला चांगले दर मिळण्यासाठी विक्री व्यवस्थेमध्ये बदल करणे आवश्यक आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील शेतकऱ्यांची पिळवणूक रोखण्यासाठी विदेशी थेट गुंतवणुकीला (एफडीआय) परवानगी देऊन पर्यायी शेतीमाल विक्रीची व्यवस्था उभारण्याची आज नितांत गरज आहे.

सद्यस्थितीत रासायनिक खत न वापरता शेणखत याचा वापर करून पूर्णपणे सेंद्रिय शेती करता येऊ शकते. मशागत करन शेती पिकवून, निगा राखून तसेच पिकणाऱ्या धआन्याचा संबंध सरळ जनतेच्या पोटाशी येतो. त्यामुळे शेतात रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय पद्धतीने शेती करणे आज गरजेचे आहे. त्यासाठी सेंद्रिय चळवळ वाढविणे आवश्यक आहे.

- डॉ. राजेंद्र पाटील सोनवणे, कृषीतज्ज्ञ.

सततची नापिकी आणि बॅंकांच्या कर्जाला कंटाळून घरातील कर्ता पुरूष आज आत्महत्या करत आहेत. त्यांच्या माघारी त्यांची पत्नी आणि मुले शेती करत संसाराला सावरत आहेत. परंतु, शासन आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे त्यांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

- आशाबाई शिवप्पा खरगे, महिला शेतकरी, पासदगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT