file photo 
नांदेड

मुदखेड पोलिस ठाण्याच्या अभिलेखाची अॅडिशनल एसपींकडून तपासणी

गंगाधर डांगे

मुदखेड (जिल्हा नांदेड) : मुदखेड पोलिस स्थानकाच्या अभिलेखाची गुरुवारी (ता. २५) भोकर विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांच्याकडून तपासणी करण्यात आली. तपासणीअंती मुदखेड पोलिस स्थानकाचा कारभार समाधानकारक असल्याचा शेरा यावेळी त्यांनी दिला.

राज्यातील प्रत्येक पोलिस स्थानकाच्या अभिलेखासह कार्यालयीन वार्षिक तपासणी केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून मुदखेड पोलिस स्थानकाच्या कारभाराचा देखील तपास करण्यात आला. यावेळी या तपास कामी मुदखेड पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा, सहाय्यक पोलिस निरिक्षक राीजू वटाने, सपोनि सुरेश भाले, बलवीर ठाकूर, केशव पांचाळ आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.

मागील वर्षी कोवीड या विषाणूमुळे संपूर्ण जगभरात हाहाकार माजला होता. त्यामुळे पोलिस प्रशासनातील प्रतिवर्षी होणाऱ्या तपासण्यासह अभिलेख तपासणी पोलिस स्थानकाचा कारभार याविषयी व कर्मचाऱ्यांची परेड आदींसह अनेक विषयावर तपासणी केली जात असे परंतु ही तपासणी कोविडमुळे करण्यात आली नव्हती. यावर्षी या तपासण्या तब्बल दोन वर्षानंतर करण्यात आल्या. मुदखेड पोलिस स्थानकाचा अभिलेख तपासणी कार्यक्रम मागील तीन दिवसापासून चालला. गुरुवारी (ता. २५) रोजी भोकरचे विजय कबाडे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांची परेड व सलामी घेऊन तपासणीस पूर्णविराम दिला. यावेळी संपूर्ण तपासणीअंती पोलिस कर्मचाऱ्यांची व मुदखेड पोलिस स्थानकाच्या कार्याची दखल घेत कौतुक केले व अशाच पद्धतीने पोलिस स्थानकाचा स्वच्छ व निर्मळ कारभार चालवावा असे सांगून स्थानिक पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना भविष्यातील कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

मुदखेड पोलिस स्थानकाला मुदखेड शहराच्या वाढत्या शहरीकरणामुळे कामकाजासाठी जुन्या पोलिस स्थानकाची इमारत कमी पडत असल्याकारणाने येथील पोलिस स्थानक नवीन व सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी शहरातील पोलिस स्थानकाची हक्काची असलेली गट क्रमांक 885 मधील दोन एकर जागा पुरेशी असून याच जाग्यावरती नवीन पोलिस स्थानकाची इमारत व पोलिस कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने प्रस्तावित बांधकाम करण्यासाठी प्रशासनाकडे लवकरच जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पाठवून नवी इमारत व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे यावेळी त्यांनी पोलिस प्रशासनाला सांगितले व जागेची पाहणी केली.

दरम्यान मुदखेड पोलिस स्थानकासाठी सदरील पाहण्यात आलेली जागा योग्य असल्याची माहिती येथील पोलीस स्थानकाचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांनी विजय कबाडे यांना दिली यावेळी मुदखेड पोलिस स्थानकाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

Jalna News : पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु; तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT