फोटो 
नांदेड

कौतुकास्पद : सफाई कामगाराच्या मुलांनी नाव कमावलं, तिघेही झाले एमबीबीएस 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे आणि तो जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे डॉ. आंबेडकरांचे वाक्य आपल्या कृतीत उतरवून व आपले दारिद्र्य जर घालवायचे असेल तर पाल्यांना उच्च शिक्षीत केल्याशिवाय पर्याय नाही. ही वज्रमुठ उराशी बांधून जाधव कुटुंबियांनी रक्ताचे पाणी करून ते सिद्ध करुन दाखविले. वेळप्रसंगी पोटाला चीमटा देऊन मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना काही कमी पडू नये यासाठी नोकरीच्या वेळेशिवाय हाताला मिळेल ते काम करण्याची मानसिकता ठेवून या परिवाराने आपले तिन्ही मुल डॉक्टर केलेत ही बिलोली तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. शिक्षणाचे महत्व काय आहे ते शिकावे या बिलोलीच्या दाम्पत्याकडून.

गंगाधर यादवराव जाधव हे स्वत: प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन ते बी.कॉम, एम. कॉम व त्यानंतर एम. ए. (अर्थशास्त्र) विषयात पदवी व पदवीत्तर शिक्षण घेतले. शिक्षण घेऊनही नोकरी नसल्याने त्यांनी एका अशिक्षीत मुलीसोबत लग्न केले. दोघांचा सुखाचा संसार चालला. या दरम्यान त्यांनी प्रतिकूल परीस्थितीत प्रपंच चालवण्यासाठी काही दिवस रेडिओ मेकॅनिकच काम केले. परंतु कालांतराने घर खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढत गेला. त्यामुळे त्यांनी नगरपरिषदेत वडिलांच्या जागी कामाठ्याची नौकरी स्विकारली. 

तिन्ही मुलांनी नाव कमावल

दरम्यान तीन मुलं व एक मुलगी असलेल्या गंगाधर व लक्ष्मीबाईनी आपल्या मुलांवर शिक्षणाचे महत्त्व बिंबवले. त्याचं फलीत या दाम्पत्याचे तिन्ही मूल वैद्यकीय शिक्षणाकडे वळले. पहिला सचिन याचे एम. बी. बी. एस (कोल्हापूर) पूर्ण झाले, दुसरा अजय बी. ए. एम. एस.च्या चौथ्या वर्षात (सांगली) शिकत आहे तर लहान अक्षय हा यावर्षी एम. बी. बी. एस. च्या पहिल्या वर्षात (नांदेड) आहे व मुलगी यावर्षी १० व्या वर्गात शिक्षण घेत आहे.

‘अनाडी आई, घर वाया जाई’ या म्हणीवर मात

आई लक्ष्मीबाई ही पूर्णतः अशिक्षीत आहे. परंतु शिक्षणाच्या बाबतीत व मुलांना सुसंस्कृत बनवण्यासाठी तीने आपलं पूर्ण आईपण पणाला लावले. दरम्यान उच्च शिक्षित कामाठी गंगाधर जाधव यांच्या तिन्ही पाल्यांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चात त्यांचे छोटे बंधु अशोक यादवराव जाधव यांनीही भरीव मदत केली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून एकाच घरातील तीन मुलांना सुसंस्कृत करणारी अशिक्षीत आई लक्ष्मीबाई हिने "अनाडी आई घर वाया जाई" या म्हणीवर मात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hinjewadi Metro : हिंजवडी-वाकडमधील मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी पीएमआरडीएचा निर्णय; २६ जोडरस्त्यांचा विकास, डिसेंबरअखेर प्रत्यक्ष कामांना सुरुवात

High Court Gift Deed Ruling : "२० वर्षांपूर्वी सुनेला बक्षीसपत्राने दिलेली मालमत्ता सासूला परत मागता येणार नाही!" उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

Pune News : स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला ‘डीआयएटी’चे बळ; अत्याधुनिक लेझर आणि फोटॉनिक्स प्रणाली विकसित करणार

Jalgaon Jalna Railway Line Tunnel : मराठवाडा-खानदेशचा प्रवास सुसाट होणार! जळगाव-जालना रेल्वे मार्गावर बनणार देशातील सर्वात मोठा २३.५ किमीचा बोगदा; ३३६ किमीचे अंतर येणार थेट निम्म्यावर!

Bhau Flex Kadha Campaign : महायुती सरकारला ‘महाराष्ट्र विद्रूपीकरण पुरस्कार’ द्या; काँग्रेसने महायुती सरकारला केले लक्ष्य

SCROLL FOR NEXT