जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. 
नांदेड

विद्यार्थ्यांना कोरोनाने आणले पुन्हा मराठीकडे, झेडपी शाळा लयभारी

प्रमोद चौधरी

नांदेड : कोरोना (Corona) काळात इंग्रजी शाळांचे (English Medium School) भरमसाठ शुल्क भरताना पालकांची पार कंबर मोडली आहे. दरम्यान काहींचे शाळा व्यवस्थापनाशी वादही झाले. त्यामुळे पालक वर्ग दुखावला असून, त्यातच त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. ही परिस्थिती मात्र जिल्हा परिषद शाळांसाठी (Education) पोषक आहे. त्यामुळे शिक्षकासह शिक्षण विभागाने संयुक्तरित्या प्रयत्न करून जिल्हा परिषद (Nanded) शाळांपासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा आपल्याकडे वळविण्याची सुवर्ण संधी आली आहे.काही अपवाद वगळता बहुतांश जिल्हा परिषद शाळांची (Zilla Parishad School) परिस्थिती खूप काही चांगली नाही. दरवर्षी विद्यार्थ्यांची घटणारी संख्या चिंतनीय आहे, तुकड्या कमी होत आहेत, दोन शिक्षक ८-१० विद्यार्थी किंवा चार वर्ग आणि एक शिक्षक असे चित्र अनेक गावात पाहायला मिळते. केवळ आपला पगार भला आणि आपण असे म्हणून काही शिक्षक (Teacher) केवळ दिवस काढत आहेत. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा दर्जा अधिक उंचावणे गरजेचे आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या शिक्षणाचे ग्रामीण भागात फार वेगवान शिक्षण पाहायला मिळत नाही.

गत दोन वर्षापासून ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी आम्ही पूर्ण फी का भरायची? असा पवित्रा कॉन्व्हेंट, इंग्रजी स्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक घेत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पालक व व्यवस्थापन यांच्यातील तणाव वाढला आहे. बऱ्याच ठिकाणी आर्थिक परिस्थितीमुळे पालकांनी इंग्रजी शाळांमधून आपल्या पाल्यांच्या टीसी काढून त्यांची नावे जिल्हा परिषद मराठी शाळेत टाकण्यास सुरुवात केली. ही जिल्हा परिषद शाळेला मोठी संधी आहे. हतबल झालेल्या पालकांना आधार देण्याची हीच वेळ आहे. इंग्रजी शाळा प्रमाणे आम्ही सुद्धा तुमच्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल करू हा विश्वास पालकांना देणे गरजेचे आहे.

शिक्षकांकडून पुढाकाराची गरज

बहुतांश ठिकाणी दुरुस्तीला आलेल्या खोल्या, शिक्षकांचा अनुशेष, विद्यार्थ्यांचे नुकसान यामुळे जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा कल कमी झाला होता. साहजिकच विद्यार्थी संख्या रोडावली, तुकड्या तुटल्या, शाळांचे अस्तित्व धोक्‍यात आले असताना गप्प बसून चालणार नाही. विद्यार्थी पालकांना आकर्षित करण्याची व जिल्हा परिषदेच्या शाळा फुलवण्याची आता गरज निर्माण झाली आहे. शिक्षकांनी मनात आणले तर हे अशक्य नाही, पण त्यासाठी शिक्षकांकडून सकारात्मक पुढाकाराची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT