मांजरम येथे चाबूक फोडो आंदोलन 
नांदेड

नांदेडमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचे चाबूक फोडो आंदोलन; रयत क्रांती संघटनेकडून निषेध

रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात दूध दर वाढीच्या मागणीसाठी चाबूक फोडो आंदोलन होत आहे.

प्रल्हाद कांबळे/ कृष्णा जोमेगावकर

नांदेड : रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मांजरम (ता. नायगाव) येथे गुरुवारी (ता. दहा) दुध दरवाढीच्या मागणीसाठी सरकारच्या प्रतिमात्मक पुतळ्यास शेणाने अंघोळ घालत चाबूक फोडो आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात दूध दर वाढीच्या मागणीसाठी चाबूक फोडो आंदोलन होत आहे. या अनुषंगाने नायगाव तालुक्यातील मांजरम येथे रयत क्रांती युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. लॉकडाऊनचा गैरफायदा घेत खाजगी दुध कंपन्या व सहकारी दूध संघांनी दूध दर विक्री प्रति लिटर १० ते १८ रुपयांनी पाडले आहेत.

हेही वाचा - कोरोनाकाळात ई-फार्मसी, ई-डायग्नोस्टिक्स आणि टेलि-कन्सल्टेशनला मोठी मागणी वाढताना दिसली

सध्या गायीच्या दुधाला दर २२ रुपये व म्हशीच्या दुधाला दर ३२ रुपये मिळतो. हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. खलीचा दर किलो ३० रुपये, पशु खाद्याचा दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अशा परिस्थिती हा दर शेतकऱ्यांना संकटात टाकणारा आहे. शुद्ध पाण्याच्या दर २० रुपये आहे. अन दुधाला प्रतिलीटर २२ रुपये. पाण्याला दुधापेक्षा जास्त महत्त्व आल्यासारखे आहे.

सरकारने उसाच्या एफआरपीनुसार दुधाला किमान आधारभूत किंमत द्यावी. गाईच्या दुधाला किमान ३० प्रती लिटर व म्हैशीच्या दुधाला किमान ६० प्रति लिटर दर द्यावे या शेतीपूरक दूध व्यवसायाला संरक्षण द्यावे, मागणी करण्यात आली. यावेळी गणेश शिंदे, सुरेश महाराज, गणेश गायकवाड, हणमंत गायकवाड, जयराज शिंदे, गोविंद गायकवाड, राजेश दरेंगाव, विनायक गायकवाड, शरद शिंदे, विश्वनाथ शिंदे इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT