nande3d sakal
नांदेड

Nanded News : पिकांसाठी मातीचे आरोग्य, जैव विविधता महत्त्वाची

कृषि अधिक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे; मृदा दिनानिमित्त कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शाश्वत शेतीसाठी मातीचे आरोग्य तेवढेच महत्त्वाचे आहे. पाण्याचा अतिवापर, रासायनिक खतांचा अतिवापर, बांधबंदिस्ती नसणे, जैवविविधता न जोपासणे यामुळे मातीचे आरोग्य धोक्यात येते. निसर्गातील सर्व घटक उपलब्ध असूनही जर मातीचे आरोग्य व्यवस्थीत नसेल तर शेतकऱ्यांना शेतीतून आर्थिक उत्पन्न घेणे आव्हानात्मक ठरेल, असे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले.

जागतिक मृदा दिनानिमित्त जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी व पोखर्णीतील कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मा कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी उपसंचालक नागरगोजे, प्रकल्प उपसंचालक आत्मा माधुरी सोनवणे, कृषी विज्ञान केंद्र येथील संचालक एस. डी .मोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देवीकांत देशमुख, डॉ. माणिक कल्याणकर, डॉ. महेश अंभोरे, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद् चाचणी अधिकारी प्रकाश पल्लेवाड यांची उपस्थिती होती.

प्रास्ताविक तंत्र अधिकारी के. एम. जाधव यांनी शेतकऱ्यांना मृदा दिनाचे महत्व सांगून मृदा दिन साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट केला. लंपी स्किन या आजाराविषयी डॉ. महेश अंभोरे यांनी माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मार्कंड येथील शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकीचे वाटप करण्यात आले. कासारखेडा येथील प्रगतशील शेतकरी राजाराम शिंदे यांचा सोयाबीनमध्ये उत्कृष्ट उत्पादन घेतल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन कृषी सहायक वसंत जारीकोटे तर तंत्र अधिकारी एस. एस. स्वामी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone Security Alert: ‘आयफोन’ वापरत असाल तर आताच करा ‘हे’ काम, अन्यथा तुमचा फोन होणार हॅक!

AAP Pune Manifesto : पुणे पालिकेसाठी 'आप'चा जाहीरनामा प्रसिद्ध; महिलांना मोफत बस प्रवास आणि 'मोहल्ला क्लिनिक'चे आश्वासन!

Sangli Election : एकाच प्रभागात अनेक दावे, अनेक गट, भाजपची अंतर्गत फूट, राष्ट्रवादीची जातीय मांडणी; प्रभाग आठ बनला रणांगण

Mumbai - Goa Highway : कोकणाच्या विकासाचा कणा अजूनही खड्ड्यातच; मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा अंत न दिसणारा प्रवास

Latest Marathi News Live Update : पुणे – नाशिक महामार्गावर रास्तारोको, वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT