file photo 
नांदेड

पाच हजाराची लाच घेणाऱ्या कृषी पर्यवेक्षकास अटक; धर्माबाद येथील घटना

प्रल्हाद कांबळे

नांदेड : धर्माबाद येथील एका शेतकऱ्यास ठिबक संचावर मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ मिळवून देण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच घेणाऱ्या धर्माबाद तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील लाचखोर कृषी पर्यवेक्षक दीपक हनवते (वय ५७) याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मंगळवारी (ता. नऊ) फेब्रुवारीच्या रात्री आठच्या सुमारास धर्माबाद येथे रंगेहात पकडले. त्याच्याविरुद्ध धर्माबाद पोलिस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धर्माबाद येथील शेतकरी यांनी आपल्या शेतात ठिबक संच मिळावा म्हणून तालुका कृषी कार्यालयात आपला प्रस्ताव सादर केला. परंतु ठिबक संचावर मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ मिळवून देण्यासाठी लाचखोर कृषी पर्यवेक्षक दीपक शंकरराव हनवते (कोळेकर) राहणार रायगडनगर, एमजीएम कॉलेजच्या बाजूस नांदेड यांनी पाच हजारांची लाच मागितली.

लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने ता. पाच फेब्रुवारी रोजी नांदेड येथे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात येऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत विभागाच्या पथकाने पडताळणी केली. पडताळणी सापळ्यातच लाचखोर कृषी पर्यवेक्षक दीपक हनवते हा पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडल्या गेला. त्याला सरकारी पंचासमक्ष अटक केली. पोलिस निरीक्षक एस. एल. नितनवरे यांच्या फिर्यादीवरुन धर्माबाद पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

या सापळा कारवाईत पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एस, एल, नितनवरे, पोलीस अमलदार किसन चिंचोरे, हनुमंत बोरकर, अमरजीतसिंग चौधरी आणि चालक मारुती सोनटक्के यांनी परिश्रम घेतले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT