नांदेडच्या विमानतळ पोलिसांची कारवाई 
नांदेड

विमानतळ पोलिसांनी 87 हजारांचा मुद्देमाल पकडला; आरोपीला अटक

सय्यद जाकेर सय्यद जाफर (वय 29) रा. महेबुबनगर, नांदेड यास ताब्यात घेतले

प्रल्हाद कांबळे

नांदेड : विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय जाधव यांच्या पथकाने एका संशयीत आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८७ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. तो मागील एका गुन्ह्यात पोलिसांना पाहिजे होता.

मंगळवारी ( ता. आठ ) जून रोजी विमानतळ पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरिक्षक विजय जाधव व त्यांचे सहकारी बाबा गजभारे, श्री. कानगुले, दारासिंघ राठोड, बालाजी केंद्रे असे गस्त करत होते. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास शोभानगरच्या बाजूस इंदिरानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक अॅटो (एम.एच. 26- जी-3628) मध्ये नवीन कपडे भरुन जात होता.

हेही वाचा - सुरक्षिततेचा हलगर्जीपणा नडला, कामगारांना बाहेर पडायला संधीच मिळाली नाही

पोलिसांनी त्याला थांबवून त्याच्या अॅटोतील रेडीमेड कापडाबद्दल विचारणा केली. यावेळी तो समाधानकारक उत्तर देवू शकला नाही. तेंव्हा पोलिसांनी अॅटो आणि सय्यद जाकेर सय्यद जाफर (वय 29) रा. महेबुबनगर, नांदेड यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे वेगवेगळ्या रंगाचे नवीन कपडे होते. अॅटोसह पोलिसांनी 87 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पुढील कायदेशीर कार्यवाही पोलिस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT