ajit pawar ncp mla nanded ncp with sharad pawar harihar rao bhosikar support of 15 taluka presidents maharashtra politics Sakal
नांदेड

Sharad Pawar NCP : ‘आम्ही सारे शरद पवारांचेच सांगाती...’ हरिहरराव भोसीकर; जिल्हाध्यक्षांसह १५ तालुकाध्यक्षांचा पाठिंबा

राष्ट्रवादी कॉंग्रेसची तातडीची बैठक मंगळवारी जिल्हाध्यक्ष भोसीकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यालयात घेण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासोबत असल्यासंदर्भातील ठराव नांदेड ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंगळवारी (ता. चार) झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

या ठरावाला जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्यासह जिल्ह्यातील १५ तालुकाध्यक्ष तसेच जिल्हा कार्यकारिणी व सर्वच फ्रंटलच्या पदाधिकाऱ्यांनी या ठरावाला पाठींबा दिला. ‘आम्ही सारे शरद पवारांचेच सांगाती...’ असे जिल्हाध्यक्ष भोसीकर यांनी सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसची तातडीची बैठक मंगळवारी जिल्हाध्यक्ष भोसीकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यालयात घेण्यात आली. ते म्हणाले की, खासदार पवार यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केली.

तेव्हा जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते बळवंतराव चव्हाण, कमलकिशोर कदम, डॉ. माधव किन्हाळकर, साहेबराव बारडकर यांच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींनी साहेबांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेऊन राष्ट्रवादीचा झेंडा जिल्ह्यात रोवला.

गेल्या २४ वर्षांत पक्षाचे जिल्ह्यातील काही सहकारी अन्य पक्षात गेले. परंतु माजी मंत्री कदम हे आजही खासदार पवार यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे.

महाविकास आघाडी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चांगले आकार घेत असताना काही जणांनी वेगळी भूमिका घेतली, असे असले तरी शरद पवार यांच्या पाठीशी जिल्ह्यातील संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे श्री. भोसीकर यांनी सांगितले.

सदर ठराव प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री कमलकिशोर कदम यांना पाठविण्यात आला आहे.

यावेळी माजी सभापती भगवान पाटील आलेगावकर, अ‍ॅड. भाऊसाहेब गोरठेकर, डॉ. परशुराम वरपडे, सरचिटणीस प्रा. डी. बी. जांभरूणकर, डॉ. विक्रम देशमुख, महिला जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर, वसंत सुगावे,

दिगांबर गवळे, चंतपराव हातागळे, संतोष दगडगावकर, सदाशिव देशमुख, सुभाष गायकवाड, धनंजय सुर्यवंशी, रंगनाथ वाघ, रमेश गांजापूरकर, प्रकाश मांजरमकर, मोहम्मद गणी यांच्यासह सर्वच फ्रंटलच्या कार्यकर्ता व पदाधिकार्‍यांनी या ठरावाला मान्यता दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT