railway
railway  sakal
नांदेड

Railway : अकोला-पूर्णा ब्रॉडगेज उपेक्षितच; २३ गाड्यांनाच ग्रीन सिग्नल, विद्युतीकरणही अपूर्णच

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा अकोला - पूर्णा लोहमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होऊन १५ वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यानंतरही या मार्गाच्या पदरी उपेक्षाच आहे. या मार्गावर चार दैनंदिन गाड्यांसह केवळ २३ रेल्वेंना आतापर्यंत ग्रीन सिग्नल मिळाला आहे. विद्युतीकरणाचे कामही अजून अपूर्णच आहे.

दक्षीण - मध्य रेल्वेच्या अखत्यारित येत असलेल्या या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यानंतर १५ वर्षांपूर्वी ११ नोव्हेंबर २००८ ला पहिली पूर्णा-अकोला पॅसेंजर धावली. त्यामुळे वाशीम, हिंगोली जिल्ह्यातील प्रवाशांच्या आशा पल्लवित झाल्या. या मार्गावर मोठ्या संख्येने प्रवासी गाड्या सुरु होतील, अशी अपेक्षा होती. परंतु, दक्षिण मध्य रेल्वेकडून या मार्गावर मालगाड्याच अधिक चालविण्यात आल्या. या मार्गासोबत दक्षिण मध्य रेल्वे दुजाभाव करत असल्याची भावना प्रवाशांमध्ये आहे.

गत १५ वर्षात अकोला-पूर्णा मार्गावर एक हमसफर, सात सुपरफास्ट, नऊ एक्स्प्रेस, सहा साप्ताहिक फेस्टिव्हल विशेष व एक पॅसेंजर अशा केवळ २३ रेल्वे धावत आहेत. अकोला-पूर्णा मार्गाचे विद्युतीकरण पूर्णा आऊटरपर्यंतच पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावर अजूनही पूर्णपणे विद्युत इंजिनवर धावणारी रेल्वे सुरु झालेली नाही. गेल्या १५ वर्षात या मार्गावर अकोल्यावरून सुरवात होणारी एकही नियमित धावणारी लांब पल्ल्याची नवीन रेल्वे सुरु झालेली नाही.

गाड्या वाढविण्याची गरज

अकोला - पूर्णा रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांची वारंवारिता वाढविण्यासोबतच अनेक प्रलंबित मागण्या आहेत. त्यात पॅसेंजरची संख्या वाढविणे, अकोला स्थानकांवर पिट लाईन बनविणे, नांदेड स्थानकावरून सुटणाऱ्या रेल्वे अकोला स्थानकावरून सुरु करणे, दक्षिण मध्य रेल्वे मार्ग मध्य रेल्वेला जोडणे आदी मागण्यांचा समावेश आहे. याशिवाय स्थानकावर सुविधा वाढविण्याबाबतही वारंवार मागणी होत आहे.

‘काचीगुडा - लालगड’सह हैदराबाद - जयपूर रेल्वेला मुदतवाढ

नांदेड - प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने काचीगुडा - लालगड - काचीगुडा आणि हैदराबाद - जयपूर - हैदराबाद दरम्यान सुरू असलेल्या विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याचे ठरविले आहे. या गाड्या निजामाबाद, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला मार्गे धावतील. काचीगुडा - लालगड (गाडी क्रमांक ०७०५३) दोन डिसेंबर ते २७ जानेवारी, लालगड - काचीगुडा (०७०५४) पाच डिसेंबर ते ३० जानेवारी, हैदराबाद - जयपूर (०७११५) एक डिसेंबर ते २६ जानेवारी, जयपूर - हैदराबाद (०७११६) तीन डिसेंबर ते २८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, लाईन ब्लॉकमुळे दौंड ते निजामाबाद एक्स्प्रेस (११४०९) तीन ते १६ डिसेंबरपर्यंत मुदखेड ते निजामाबाद तर निजामाबाद ते पंढरपूर एक्स्प्रेस (०१४१३) चार ते १७ डिसेंबरपर्यंत निजामाबाद ते मुदखेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT