अशोक चव्हाण esakal
नांदेड

मी बोलतो कमी; पण काम अधिक करतो,पालकमंत्री अशोक चव्हाण

भोकर तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ

सकाळ वृत्तसेवा

भोकर : राज्यात महाविकास आघाडी सरकार सुरळीतपणे कारभार करीत आहे. विरोधक त्यांच्यापरिने काम करीत आहेत. विकासाचा अजेंडा घेऊन आमचं पाऊल पडत आहे. राज्यातील रस्ते गुळगुळीत होताना दिसत आहेत. भोकर मतदारसंघात पाण्याची साठवण झाली की तालुका सुजलाम सुफलाम होईल. कोट्यावधी रुपयांचा निधी विकास कामांना मिळत आहे. मी बोलतो कमी पण...काम मात्र अधिक करतो असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विविध विकास कामाच्या शुभारंभप्रसंगी शनिवारी (ता.२२) केले.

भोकर तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ सावरगाव माळ, पाळज, रावणगाव येथे करण्यात आला. या वेळी गोविंद शिंदे नागेलीकर, अप्पाराव देशमुख सोमठाणकर, निता रावलोड, प्रकाश भोसीकर, नागनाथ घिसेवाड, सागरबाई जाधव, जगदीश पाटील भोसीकर, विश्वंभर पवार, अॅड. शिवाजी कदम, रजीयोद्दीन खाजू इनामदार, माधव अमृतवाड, विठ्ठल धोंडगे, विकास क्षिरसागर, भगवान दंडवे, गोविंद बाबा गौड पाटील, मारोती बल्लाळकर, शेख यूसुफ, गणेश राठोड, रामचंद्र मुसळे, मिर्झा ताहेर बेग यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरू असल्याने जनतेने आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आरोग्य विभाग सक्षम असल्याने

संकटातून आपली नय्या पार होईल. लोकाभिमुख विकासाचा पाया भक्कम करण्याचे काम आघाडी सरकार करत आहे.नांदेड जिल्हा आणि माझ्या मतदारसंघात कदापी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. तालुक्यातील रस्ते, सिंचन, आरोग्य, शिक्षणाच्या बाबतीत योग्य आखणी करण्यात आल्याने भविष्यातील अडचणी दुर होतील. काही लोक नारळ फोडतात आणि गायब होतात माझं तसं नाही असे या वेळी सांगितले. तेसच राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आघाडी सरकार आहे. कै. शंकरराव चव्हाण आणि बाळासाहेब ठाकरे यांचे चांगले संबंध होते. योगायोगाने रविवारी (ता.२३) ठाकरे यांची जयंती आहे. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो आहे असे जाहीर सभेत बोलताना सांगितले.

तीर्थक्षेत्राचे रस्ते मार्गी लावू

जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र असलेल्या पाळज, माहूर, आणि तेलंगणातील बासरला जाण्यासाठी विशेष सिमेंट रस्ता होणार आहे. नांदेड शहरातील रस्त्यांसाठीही निधी मंजूर केला आहे. आरोग्य विभाग, पशू संवर्धन, शिक्षण विभाग भवीष्यात दर्जेदार करण्याचा संकल्प आहे, तो मी तडीस नेल्या शिवाय स्वस्त बसणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Kolhapur Student Death Case : बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा..., मुलीचे शेवटचे शब्द, कुटुंबीयांनी नाकारलं विद्यार्थिनीने नको ते केलं

तारिणी केदारला मनातल्या भावना सांगणार, प्रेमाची कबुली देताच मोठा अनर्थ घडणार, प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले...

IPL Schedule Change: IPL च्या सामन्यांमध्ये होणार मोठी वाढ! पण कधीपासून? अरुण धुमल यांनी जाहीर केलं वर्ष!

Enforcement Directorate: EDची ताकद वाढणार! १२०० पेक्षा जास्त पदांवर होणार भरती, जागांमध्ये मोठी वाढ; केंद्र सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT