file photo 
नांदेड

सरपंच पदाच्या सर्व आरक्षण सोडती रद्द, इच्छुकांचा हिरमोड, राजकीय समीकरणे बिघडली

प्रल्हाद कांबळे

नांदेड : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील एक हजार १५ ग्रामपंचायतीसाठी येत्या ता. १५ जानेवारीला मतदान होणार असून त्यासाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. दरम्यान या पूर्वीच्या जिल्ह्यामध्ये सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात आली होती. या सर्व आरक्षण सोडती रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे आता ग्रामपंचायत निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत नव्याने आरक्षण सोडत काढली जाईल.

यापूर्वी जाहीर झालेले सरपंच पदाचे आरक्षण रद्द होणार असल्याची चर्चा दोन दिवसांपासून सुरु होती. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण होते. परंतु ता. १६ डिसेंबर रोजी शासनाने याबाबत आदेश काढले. त्यामुळे संभ्रम दूर झाला आहे. सदर आदेशानुसार ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच त्या जिल्ह्यामध्ये सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्या जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडती रद्द करण्यात आल्या आहेत. आता ग्रामपंचायत निवडणुकीनंतर ३० दिवसाच्या आत नव्याने सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

सरपंच पदाच्या आरक्षणानंतर संबंधित जातीच्या दाखल्यांची पडताळणी वेळेत न होणे. जातीचा दाखला मान्य न होणे, तसेच बनावट प्रमाणपत्र सादर करणे इत्यादी कारणामुळे निवडणूक रद्द करुन पुन्हा नव्याने निवडणूक घेणे क्रमप्राप्त ठरते. या पार्श्वभूमीवर सारासार विचार करुन सरपंच आरक्षण सोडत याबाबत एक समान धोरण असावे. तसेच होणाऱ्या गैर प्रकारांना पायबंद बसावा यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे. सदर आदेशामुळे सरपंच पदावर बसण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. नव्याने आरक्षण सोडत काढल्यानंतर आधीच्या आरक्षणात बदल होण्याची शक्यता असल्याने भावी सरपंचाचा जीव टांगणीला लागला आहे. एकूणच सरपंच पदाचे आरक्षण रद्द झाल्याने गावागावातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT