File photo 
नांदेड

नांदेडमध्ये कोरोनाचा कहर, त्यात उन्हाच भर, नागरिक त्रस्त 

प्रमोद चौधरी

नांदेड ः जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे उन्हाचा पारा सुद्धा चाळीशीकडे आगेकूच करत असल्याने आगामी दिवसात नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेचा अधिक सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे झाले आहे. त्यासोबतच उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह सुद्धा थांबला आहे. परिणामी हिवाळा संपला असून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याचे दिसून येत आहे. नांदेडचे कमाल तापमान चाळीशीवर जात आहे. दिवसासह रात्री सुद्धा नागरिकांना उकाड्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे काही घरांमध्ये कुलर सुरू झाले असून दिवसा गर्मीपासून सुटका व्हावी, यासाठी नागरिक घरात पंख्याचा व घराबाहेर सावलीचा आसरा घेत आहेत. नेहमीप्रमाणेच यावर्षी सुद्धा उन्हाची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांना उन्हाळा घाम फोडणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. 

हेही वाचा - जिल्हा बॅंक निवडणुक : हेलिकाॅप्टर व रोड रोलरचे भवितव्य मतपेटीत बंद; 97.98 टक्के मतदान
  
उष्मांक वाढता राहील 
जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागल्याने आगामी दिवस नागरिकांसाठी तापदायक ठरतील. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमान चाळीशीच्या वर असल्याने यावर्षी उन्हाळ्याचे आगमन लवकरच झाल्याचेही दिसून येत आहे. रात्रीच्या तापमानाची सुद्धा १८ अंश सेल्सियसपर्यंत नोंद होत असल्याने रात्री नागरिकांना गर्मीचा त्रास सहन करावा लागत आहे. 

येथे क्लिक कराच - विशेष बातमी ः हाताला काम नाही व पोटाला अन्न नाही कसे जगायचे मायबाप, पालातील कुटुंबाची प्रशासनाला आर्त हाक
 
कोरोना बाधित रुग्णांसोबत मृत्यूसंख्याही वाढली
दुसऱ्या टप्प्यामध्ये नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांसोबतच मृत्यूसंख्याही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे नांदेडकरांमध्ये मोठी धास्ती बसली असून, अनेकांनी घरीच राहणे पसंद केलेले आहे. एक एप्रिल रोजी 995 बाधित रुग्ण तर 26 मृत्यू आणि शुक्रवारी (ता.दोन एप्रिल) एक हजार 246 बाधित आणि 23 मृत्यू झाले आहेत. परिणामी वाढत्या उन्हासोबतच नांदेडकरांनी आता कोरोनाचेही चटके सहन करावे लागत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

Pune Solapur Railways: प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास गतिमान; मांजरीपासून दोन नवीन मार्गिकांचे नियोजन, भूसंपादनाला सुरुवात

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Asian Games: भारतीय खेळाडूंचे दणादण गोल! हॉकीमध्ये पहिल्या सामन्यात पुरुष व महिला संघांची धडाकेबाज विजयी सलामी

SCROLL FOR NEXT