इस्लामपूर येथे महिलेचा खून 
नांदेड

मुलीच्या प्रेमविवाहाचा राग; बापाने शेजारी महिलेचा गळा चिरुन केला खून

ईस्लापूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बुरकूलवाडी (ता. किनवट) येथील बेबीबाई भिमराव चव्हाण (वय ४०) या महिलेच्या घराशेजारी राहणाऱ्या सुरेश धनसिंग राठोड ( वय ५० ) यांची मोठी मुलगी हिचा गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळाल्याने सहा महिन्यापूर्वी दोघांचा विवाह लाऊन देण्यात आला होता.

गंगाराम गड्डमवार

ईस्लापूर (जिल्हा नांदेड) : माझ्या मुलीच्या प्रेम विवाह करण्यास तुच करणीभुत असल्याचा राग मनात धरुन सुरेश धनसिंग राठोड (वय ५०) याने लोखंडी धारदार कोयत्याने बेबीबाई भिमराव चव्हाण (वय ४०) या महिलेचा गळा चिरुन खून केला. दिवसाढवळ्या महिलेचा खून करुन मारेकरी हत्यारासह ईस्लापूर पोलिस ठाण्यात हजर झाला. सोमवारी (ता. ३१) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बुरकूलवाडी (ता. किनवट) येथे घटना घडल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मारेकऱ्यास अटक केली आहे.

ईस्लापूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बुरकूलवाडी (ता. किनवट) येथील बेबीबाई भिमराव चव्हाण (वय ४०) या महिलेच्या घराशेजारी राहणाऱ्या सुरेश धनसिंग राठोड ( वय ५० ) यांची मोठी मुलगी हिचा गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळाल्याने सहा महिन्यापूर्वी दोघांचा विवाह लाऊन देण्यात आला होता. पण ही बाब मुलीचे वडील सुरेश धनसिंग राठोड यांना मान्य नव्हती. त्यामुळे तो नाराज होता. या कारणावरुन मुलांच्या नातेवाईकाशी वाद घालत असे. ही बाब त्याच्या मनात सतत सलत असल्याने. या कारणावरुन बेबीबाई या महिलेस तुच माझ्या मुलीचा प्रेम विवाह लाउन दिलास. हे सर्व कारस्थान तुझे आहे. तुला मी सोडणार नाही. तुला मी कधी ना कधी तरी बघून घेतो. असे बेबीबाईस सहा महिण्यापासुन धमकी देत असे. असे तक्रारीमध्ये नमूद केले आहे.

हेही वाचा - नांदेडमध्ये वाळूमाफियांपुढे महसुल तर मटका जुगारामुळे पोलिस हतबल; लोकप्रतिनिधींचे दूर्लक्ष

सोमवारी सकाळी बेबीबाई ही महिला अंगणातील जनावराचा गोठा साफ करत असतांना अचानक माझ्या आईचा किंचाळण्याचा आवाज आल्याने घराबाहेर आलो असता. माझी आई अंगणात रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेली दिसली. पळत जाऊन पाहिले असता. माझ्या आईच्या गळ्यावर लोखंडी कोयत्याने वार केल्याने ती जागीच मरण पावली होती. त्यावेळी माझा लहान भाऊ अक्षय यांनी सांगितले की. सुरेश धनसिंग राठोड हा त्याच्या हातात रक्ताने भरलेला लोखंडी कोयता घेऊन पळून जाताना पाहिले. असा जवाब मयताचा मुलगा मनोज भिमराव चव्हाण यांनी दिला आहे.

सदर घटनेनंतर आरोपी सुरेश धनसिंग राठोड हा रक्ताने भरलेला कोयता घेऊन ईस्लापूर पोलिस ठाण्यात स्वत: च हजर झाला. या ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत किनगे, पोलिस उपनिरीक्षक योगेश बोधने यांनी आरोपीस ताब्यात घेऊन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेचा पंचनामा करुन प्रेत शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. या घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन ईस्लापूर पोलिसांना मार्गदर्शन केले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, चार जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT