mahadbt mahadbt
नांदेड

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

पिक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात अनुदान उपलब्ध करुन दिले जाणार आहे

सकाळ वृत्तसेवा

पिक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात अनुदान उपलब्ध करुन दिले जाणार आहे

नांदेड: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्न-धान्य पिके व गळीतधान्य २०२१ - २२ अंतर्गत रब्बी हंगामासाठी प्रमाणित बियाणे वितरण, पिक प्रात्याक्षिके, सुधारीत कृषी औजारे व सिंचन सुविधा साधणे या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांना महाडीबीटी प्रणालीद्वारे ता. ३० ऑगस्ट ते ता. १० सप्टेंबर या कालावधीत अर्ज महाडीबीटी पोर्टलवर करावेत. पिक प्रात्यक्षिके शेतकरी गटामार्फत राबविले जाणार आहेत. यासाठी कृषी सहायकांशी संपर्क साधून दहा हेक्टर क्षेत्र असणाऱ्या गटांनी नोंदणी करावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

या योजनेत कडधान्य (हरभरा), पोष्टिक तृणधान्य (ज्वारी), गळीत धान्य (करडई) निर्देशीत आहे. बियाणे वितरणामध्ये हरभरा बियाणासाठी दहा वर्षाआतील वाणास रुपये २५ प्रती किलो, दहा वर्षावरील वाणास १२ रुपये प्रती किलो, रब्बी ज्वारी बियाणांसाठी दहा वर्षातील वाणास ३० रुपये प्रती किलो, दहा वर्षावरील वाणास १५ रुपये प्रती किलो, करडई बियाणांसाठी ४० रुपये प्रती किलो असे एकुण किंमतीच्या ५० टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला दोन हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.

पिक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात अनुदान उपलब्ध करुन दिले जाणार आहे. बियाणे जैविक खते, सुक्ष्म मुलद्रव्ये, भू सुधारके व पीक संरक्षक औषधे या निविष्ठासाठी एकर मर्यादेत डीबीटी तत्वावर अनुदान अदा करण्यात येईल. एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी पिकाच्या प्रकारानुसार दोन हजार ते चार हजार प्रती एकर मर्यादेत डीबीटी तत्वावर अनुदान दिले जाईल. यासाठी कृषि विद्यापिठातील शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून शेतकऱ्यांची निवड ऑनलाइन व लॉटरी पद्धतीने होणार असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT