Education Department Sakal
नांदेड

हदगावच्या शिक्षण विभागात सावळा गोंधळ

ज्येष्ठता डावलून दुसरेच गटशिक्षणाधिकारीपदी ः सेवा ज्येष्ठतेच्या अधिकाऱ्यास डावलले

सकाळ वृत्तसेवा

हदगाव - येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात सर्व सावळा गोंधळ सुरू असून मागील वर्षी प्रकाश जाधव सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी पूर्ण वेळ गट शिक्षणाधिकारीपदी एखाद्या गटशिक्षणाधिकारी दर्जाच्या व्यक्तीची नियुक्ती होईल असे वाटले होते. परंतु त्या ठिकाणी शिक्षण विस्तार अधिकारी सुनील पाटील यांची नियमाप्रमाणे नियुक्ती होणे गरजेचे होते, परंतु तसे न होता मागील वर्षापासून किशन फोले हेच गटशिक्षणाधिकारी पदाचा संपूर्ण कारभार पाहत आहेत.

सेवानिवृत्तीनंतर या कार्यालयाला कायमस्वरूपी गट शिक्षणाधिकारी पद हे भरणे अपेक्षित होते. परंतु तसे न होता शिक्षण विस्तार अधिकारी किशन फोले यांची तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी फोले यांची याठिकाणी गटशिक्षणाधिकारीपदी नियुक्ती केली. वास्तविक पाहता सेवा ज्येष्ठतेनुसार सुनील पाटील यांचा सेवा निवृत्ती होण्याचा केवळ एक वर्षाचा कार्यकाळ शिल्लक राहीलेला आहे. त्या तुलनेत किशन फोले यांची शासकीय सेवा आणखीन शिल्लक असतानाही सुनील पाटील यांना डावलून किशन फोले यांची गट शिक्षणाधिकारीपदी प्रभारी म्हणून कशी काय? नियुक्ती केली हा विषय संपूर्ण तालुक्यात चर्चिला जात आहे.

हदगाव तालुक्यात १९६ शाळा असून शिक्षक संख्या जवळपास ७५० एवढी आहे. त्यामुळे शिक्षण विस्तार अधिकारीपदी नियुक्ती असलेल्या किशन फोले यांच्याकडून गटशिक्षण अधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार काढून घ्यावा आणि त्यांच्या ठिकाणी अर्धापूर या नजीकच्या तालुक्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी गटशिक्षण अधिकारीपदी कार्यरत असलेल्या ससाने यांना याठिकाणचा प्रभारी कार्यभार द्यावा अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, शिक्षकांचे एक शिष्टमंडळ आमदार जवळगावकर यांच्याकडे लवकरच आपली सर्व व्यथा मांडणार आहेत.

आमदार जवळगावकरांनी लक्ष घालण्याची गरज

हदगाव व हिमायतनगर हे दोन्ही तालुके मोठ्या लोकसंख्येचे आणि विद्यार्थी संख्येचे असून हदगाव तालुक्यात १९६ तर हिमायतनगर तालुक्यात ८० शाळा कार्यरत आहेत. दोन्ही तालुक्यात मिळून जवळपास बाराशे शिक्षक संख्या आहे. असे असतानाही हदगाव व हिमायतनगर या दोन्ही तालुक्याच्या ठिकाणी गटशिक्षणाधिकारी पद हे ‘प्रभारीं’कडेच आहे. या बाबीकडे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी लक्ष घालून शिक्षण विभागात चाललेला सावळा गोंधळ थांबवावा, अशी मागणी शिक्षण प्रेमींमधून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo : भावनिक क्षण! ख्रिस्तियानो रोनाल्डो रडला... मैदानावर एकटा उभा राहिला; फुटबॉलविश्व स्तब्ध Video

Portugal vs Spain : स्वप्न तुटले! ख्रिस्तियानो रोनाल्डोचा वर्ल्ड कप प्रवास संपला! पोर्तुगालला माजी विजेत्या स्पेनकडून पराभवाचा धक्का

Pune Heavy Rain : पुणेकर त्रस्त; यंत्रणा मात्र सुस्त, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला उशिरा जाग

LPG import updates: 'एलपीजी'बाबत सरकारने प्लॅन बदलला! अमेरिकेसोबत मोठा निर्णय, गॅसचं संकट टळणार

Pune Heavy Rain : पावसाने दाणादाण! जनजीवन विस्कळित, घरांसह दुकानांमध्ये शिरले पाणी

SCROLL FOR NEXT