file photo 
नांदेड

अर्धापुरात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दारु विक्रेते व हाॅटेल चालकांकडून दंड वसूल

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या प्रशासनाची झोप उडविणारी आहे. वाढत्या रुग्णसंखेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांनी हाॅटेल, दारु दुकाने, बीअर बार, धाबे,आईस्क्रीम पार्लर, आठवडे बाजार यावर निर्बंध घातले आहेत. या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या अर्धापूर शहरातील दारु दुकानदार, हाॅटेल चालकाविरुध्द महसुल, पोलिस व नगरपंचायत प्रशासनाने धडक मोहीम हाती घेऊन दंडात्मक कार्यवाही शुक्रवारी (ता. 19) केली. शहरातील विविध व्यावसायीकांकडून साडेपंधरा हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

ही कार्यवाही अशीच पुढे सुरु ठेवण्यात येणार आहे. प्रशासनाच्या आदेशांचे पालन सर्वांनी करावे आसे आवाहन करण्यात आले आहे.

अर्धापूर शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासनाने आदेश जारी केला आहे. पण या आदेशाचे शहरासह तालुक्यातील व्यावसायीकांना, नागरिकांना नाही. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होवू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हाॅटेल, दारु दुकान, बिअरबार, आईसक्रीम पार्लर, मिठाई, धाबे आदी दुकानातून केवळ पार्सलची सेवा देण्याचे आदेश आसतांना वरील ठिकाणी गर्दी होतांना दिसून येत आहे तसेच आदेशाचे उल्लंघन करण्यात येत आहे.

शहरात मुख्याधिकारी मारोतराव जगताप, पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे, कार्यालयीन अधिक्षक मदन डाके यांच्या पथकाने शहरात धडक कार्यवाही केली. हाॅटेल, दारु दुकाने आदी ठिकाणी छापे टाकले असता प्रशासनाच्या आदेशचे उल्लंघन होत आसल्याचे निदर्शनास आले. अशा प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणा-या विविध व्यावसायीकाकडून साडेपंधरा हजार दंड वसूल करण्यात आला आहे. या कार्यवाहीत कैलास देशमुख, शिवाजी कांबळे,शिवानंद खंडागळे, राहूल बारसे, विजय केसगीर, प्रविण नरवाडे, राजु पतंगे आदी अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT