file photo 
नांदेड

अर्धापुरात पुन्हा बिबट्याचा वावर, बकरा केला फस्त; शेतकऱ्यांत भितीचे वातावरण, खैरगाव शिवारातील घटना

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : रोडगी ( ता. अर्धापूर ) शिवारातील विहिरीत बिबट्या पडल्याची घटना ताजी असतांनाच याच परिसरातील खैरगाव (जिल्हा नांदेड)  शिवारातील घटना रविवारी शनिवारी (ता. 16) सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शेतक-यात भितींचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात काही दिवसाच्या अंतराने पुन्हा बिबट्याचा वावर आसल्याच्या संशायामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तर वनविभागाने या घटनेची माहिती घेण्यासाठी कर्मचारी पाठविला आहे.

अर्धापूर तालुक्यातील रोडगी शिवारात अनिल कदम यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला चार तास रेस्क्यु आॅपरेशन करुन सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाच्या रेस्क्यु टिमला यश आले होते. ही घटना गुरुवारी (ता. 14)  झाली होती. त्यानंतर  याच परीसारातील खैरगावा (म) येथील एका शेतातील आखाड्यावर बक-याचा फडशा पाडल्याची घटना पुढए आली आहे.

खैरगाव शिवारात सतीष संजय लांडगे यांचे शेत आहे. या शेतात सालगडी म्हणून काम करणा-या शेतमजूराने आखाड्यावर बक-याला बांधले होते. सदरील बकऱ्यास शनिवारी (ता. 15) रात्री बिबट्याने फस्त केल्याची घटना शनिवारी सकाळी (ता. 16) उघडकीस आली आहे आशी माहिती पंजाब चव्हाण यांनी दिली.

याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी शरयू रुद्रावार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, सदरील घटनेची माहिती घेण्यासाठी कर्मचा-या खैरगावाला पाठविण्यात येईल. तसेच सदरील बकऱ्यास जर वन्यपशुने मारले असतील तर शासनाच्या नियमाप्रमाणे शासकीय मदत देण्यात येईल. बिबट्याचा शोध घेण्यात येईल अशी माहिती दिली.

या परिसरात दोन दिवसाच्या आड बिबट्याचा वावर असल्याचा संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे भितींचे वातावरण निर्माण झाले आहे. हे दोन्ही बिबटे एकाचवेळी शिकारीसाठी बाहेर पडले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे. तर वनविभागाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT