file photo 
नांदेड

अर्धापूर नगरपंचायत झाली थकबाकीमुक्त; 29 लाख रुपयांचा केला एकरकमी भरणा

प्रल्हाद कांबळे

नांदेड : स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पाणीपुरवठा व पथदिव्यांची अनेक वर्षापासून सुरू असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरण अविरत प्रयत्न करत आहे. या प्रयत्नातूनच अर्धापूर नगरपंचायतीने 29 लाख 17 हजार 810 रूपयांची एकरकमी थकबाकी भरून थकबाकीमुक्त नगर पंचायत होण्याचा बहूमान प्राप्त केला आहे.

महावितरणच्या अर्धापुर उपविभागाअंतर्गत अर्धापुर नगर पंचायतचे पाणीपुरवठा योजनेचे चालू बिलासह 11 लाख 81 हजार 990 रूपयांचे वीजबील थकीत होते तर पथदिव्याचे 17 लाख 35 हजार 820 रूपये वीजबील थकीत होते. मार्च अखेर थकबाकी वसूलीसाठी महावितरण पत्र, सुसंवाद त्याचबरोबर सातत्याने पाठपुरावा करुन थकीत वीजबील वसूलीसाठी प्रयत्न करत आहे. नांदेड ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता आर. पी.चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा करून अर्धापूर नगर पंचायतीकडे थकीत असलेले एकोणतीस लक्ष सतरा हजार आठशे दहा रुपये एकरकमी आरटीजीएसच्या माध्यमाव्दारे वसूल करण्यात यश मिळवले. 

थकबाकीमुक्त झाल्यामुळे अर्धापूर नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी सुनिल जगताप व नगराध्यक्ष लायक शेख यांचा महावितरणच्या वतीने पुष्पगुच्छ देवून कार्यकारी अभियंता आर. पी. चव्हाण यांनी सत्कार केला. याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता श्री कादरी, सहाय्यक लेखापाल डी. डी. इंगोले व उच्चस्तर लिपिक राजकुमार सिंदगीकर उपस्थित होते. संपूर्ण थकबाकी वसूल केल्याबद्दल अर्धापूर नगरपंचायत व नांदेड ग्रामीण विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्ताञय पडळकर आणि अधीक्षक अभियंता संतोष वाहणे यांनी अभिनंदन केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: १८ वेळा चाकूने वार, नंतर गळा चिरला; १४ वर्षाच्या मुलाने १० वर्षांच्या मुलीला संपवलं, 'त्या' चुकीमुळे प्रकरणाचा उलगडा

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Asia Cup 2025: भारताच्या ७ खेळाडूंचे आशिया चषक संघात पदार्पण; त्यापैकी पाच प्लेइंग इलेव्हनमध्ये नक्की दिसणार

Latest Marathi News Updates : ओबीसी समाज बांधवांची बैठक ठरली फिकी; रिकाम्या खुर्च्या ठळकपणे जाणवल्या

Chandrababu Naidu: ‘एनडीए’च्याच उमेदवाराला पाठिंबा; चंद्राबाबू नायडू यांचे स्पष्टीकरण, राधाकृष्णन यांचे केले कौतुक

SCROLL FOR NEXT