file photo 
नांदेड

अर्धापूरमध्ये कोरोनाच्या सावटाखाली बच्चे कंपनीने लुटला रंगोत्सवाचा आनंद

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक लाॅकडाऊन सुरु असून बच्चे कंपनीने कोरोनाच्या सावटाखाली रंगांची उधळण करित रंगपंचमी साजरी केली. एकमेकांना रंग लावून रंगोत्सव साजरा केला तसेच शुभेच्छाही दिल्या. 

गेल्या वर्षभरात कोरोनाच्या सावटाखाली सगळे सण, उत्सव साजरे करण्यात आले. होळी व रंगोत्सव हा वर्षाच्या शेवटी येणार सण. या उत्सवाची सर्वांना ओढ लागलेली असते. तसेच सृष्टीलाही वसंत ऋतुची चाहूल लागलेली असते. अशा आनंदमयी वातावरणात येणार हा सण यंदा कोरोनाच्या दुस-या लाटेत आल्याने बच्चे कंपनीचा थोडा हिरमोड झाला.

नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून दहा दिवसाचा लाॅकडाऊन सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे रंगोत्सव साजरा करण्यावर काही बंधने आली आहेत. अर्धापूर शहरासह तालुक्यातील बच्चेकंपनीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने एकमेकांना रंग लावून रंगोत्सव साजरा केला. तसेच कोरडा रंगाचा वापर करण्यात आला.

अर्धापूर शहरातील विविध भागातील छोट्या मित्र व मैत्रीनींने एकमेकांना भेटून होळी व रंगोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तर तरुणांनी शेतात जावून सामुहिक भोजणाचा आनंद लुटला. यंदा जरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणात उत्सव साजरा केला आसला तरी पुढील वर्षी कोरोनाचे संकट जाऊन मुक्तपणे रंगांची उधळण करित होळी साजरी करण्याच्या शुभेच्छा दिल्या.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT