Ashok Chavan join BJP sakal
नांदेड

Ashok Chavan join BJP : सोबत, पाठिंबा, आनंद, नाराजी अन् संभ्रम! ; अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरानंतर नांदेड जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची स्थिती

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर त्याचे पडसाद नांदेड शहर आणि जिल्ह्यात उमटले. काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राजीनामे देत आपण अशोक चव्हाण यांच्यासोबत असल्याचे सांगितले तर काही जण अजूनही संभ्रमावस्थेत असल्याचे चित्र आहे.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर त्याचे पडसाद नांदेड शहर आणि जिल्ह्यात उमटले. काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राजीनामे देत आपण अशोक चव्हाण यांच्यासोबत असल्याचे सांगितले तर काही जण अजूनही संभ्रमावस्थेत असल्याचे चित्र आहे.

नांदेड महापालिकेतील काही मुस्लिम समाजातील माजी पदाधिकारी, नगरसेवकांनी आज मुंबई गाठून कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. आम्ही कॉँग्रेससोबतच असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, नवा मोंढ्यातील कॉँग्रेसच्या कार्यालयासमोर लावण्यात आलेले अशोक चव्हाण यांचे फलक काढण्यात आले. दुसरीकडे भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्या निर्णयाचे स्वागत करत महावीर चौकात जल्लोष केला.

फलक काढले, फलक लावले!

चव्हाण यांच्या समर्थकांनीही त्यांच्यासोबत असल्याचे सांगत राजीनामा दिला आहे. त्यामध्ये प्रवक्ते संतोष पांडागळे, माजी नगरसेवक श्याम दरक, महिला आघाडीच्या राज्य सरचिटणीस सुमती व्याहाळकर आदींसह अनेकांचा समावेश आहे. कॉँग्रेसच्या नवा मोंढा येथील कार्यालयात आणि समोर लावण्यात आलेले अशोक चव्हाण यांचे फलक हटविण्यात आले आहेत. दुसरीकडे नांदेड शहरात ठिकठिकाणी चव्हाण यांचे फलक लावून पाठिंबाही देण्यात आला आहे.

‘पुन्हा लीडर कसे काय झाले?’

कॉँग्रेस नेते खासदार राहुल गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिलेला ‘डरो मत’चा नारा घेऊन आगामी काळात लढणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे, सरचिटणीस ॲड. सुरेंद्र घोडजकर आदींनी आज (ता. १३) पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेसचे पूर्वाश्रमीचे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपचे कमळ हाती घेतले आहे. त्यांच्या या निर्णयाचे दुःखच आहे. अशोक चव्हाण हे लीडर नाहीत तर डीलर आहेत, असा आरोप भाजपच्या काही नेत्यांनी यापूर्वी केला होता. आज ते लीडर कसे काय झाले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. एक व्यक्ती म्हणजे पक्ष नव्हे. या पक्षात फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारे अनेक कार्यकर्ते आहेत. काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळात निकराची लढाई लढेल. कुठला नेता पक्ष सोडून गेला म्हणजे काँग्रेसची वोटबँक कमी होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माजी नगरसेवक प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला

दरम्यान, नांदेड महापालिकेतील मुस्लिम समाजातील माजी पदाधिकारी, नगरसेवकांनी आज मुंबईत कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. त्यामध्ये माजी महापौर अब्दुल सत्तार, माजी उपमहापौर मसूद खान, शमीम अब्दुल्ला, माजी नगरसेवक तथा प्रवक्ते मुन्तजीब, माजी नगरसेवक शेर अली, अब्दुल गफूर आदींचा समावेश होता. नांदेडला लवकरच काँग्रेसचे पक्षनिरीक्षक येऊन आढावा घेतील, अशी माहिती प्रवक्ते मुन्तजीब यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB: मुंबई इंडियन्स संघात दोन मोठे बदल, बंगळुरूने हेजलवूडला संघातून काढलं; पाहा Playing XI

Pune fraud crime News: दैवी शक्तीचे आमिष दाखवून भोंदूकडून महिलेवर लैंगिक अत्याचार; ५० लाखांची फसवणूक, स्वारगेट पोलिसांत गुन्हा

Pune Loni Kalbhor fraud case: बॉटलिंग प्लान्ट भागीदारीच्या आमिषाने २ कोटी ३४ लाखांची फसवणूक; लोणी काळभोर पोलिसांकडून दोघांना अटक, एक फरार

IPL 2026, LSG vs GT: जॉस बटलर - शुभमन गिल बरसले, गुजरातचा सलग दुसरा विजय; रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का

Coal Rate: आता वीज बिल वाढणार नाही! कोल इंडियाचा मोठा निर्णय; उद्योग आणि ग्राहकांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT