ashok chavan over bjp shiv sena alliance maha vikas aghadi maharashtra politics sakal
नांदेड

Maharashtra Politics : महाविकास आघाडी कायम तर विजय निश्चित!

अशोक चव्हाण यांची भूमिका निर्णायक, भाजप - सेना युतीकडूनही जोरदार मोर्चेबांधणी

अभय कुळकजाईकर

नांदेड : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पाच बाजार समितीच्या निवडणुका तसेच लेबर फेडरेशनची निवडणुकीचे निकाल लक्षात घेता महाविकास आघाडीची वज्रमूळ अशीच कायम राहिली तर जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकीमध्ये त्यांच्या विजयाची शक्यता अधिक असल्याचे चित्र आहे.

त्याचबरोबर काॅग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भूमिकाही तितकीच महत्वाची आहे. त्यांच्या निर्णयावरच महाविकास आघाडीचे यश अवलंबून आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार आणि हिंगोलीचे खासदार हे शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे. तसेच केंद्रात आणि राज्यातही भाजपचे सरकार असल्याने युतीकडूनही जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

जिल्ह्यात पूर्वी शिवसेनेचे बऱ्यापैकी वर्चस्व होते. मात्र, मध्यंतरीच्या काळात कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसने ते मोडून काढण्यात यश मिळवले. मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्हा कॉँग्रेसमय केला. महापालिका, जिल्हा परिषदेसह नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती आदी ताब्यात घेत एकहाती वर्चस्व निर्माण केले. मात्र, २०१४ पासून केंद्रात आणि त्यानंतर राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर नांदेड जिल्ह्यात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून भाजपने शिरकाव करत बऱ्यापैकी बस्तान बसविले.

राज्यात आणि केंद्रात सत्ता नसताना देखील माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यावर बऱ्यापैकी वर्चस्व टिकवले होते. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादीची फारशी साथ नव्हती. दरम्यानच्या काळात महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आली आणि श्री. चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद आले.

त्यामुळे पुन्हा त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादीला सोबत घेत जिल्ह्यात वर्चस्व ठेवले तर दुसरीकडे भाजपचे नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न सुरू ठेवले. आता राज्यात शिंदे - फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यामुळे केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या माध्यमातून खासदार चिखलीकर, खासदार हेमंत पाटील आणि आमदार बालाजी कल्याणकर यांनी आणखी जोमाने काम करण्यास सुरूवात केली आहे.

दरम्यानच्या, काळात बाजार समितीच्या निवडणुका जिल्ह्यात झाल्या. तसेच मजूर फेडरेशनचीही निवडणुक झाली. या निमित्ताने महाविकास आघाडी आणि भाजप सेना युतीला निवडणुकीच्या माध्यमातून ‘किसमे कितना है दम...’ दाखविण्याची संधी मिळाली.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीची वज्रमुठ कायम ठेवत बाजार समितीवर यश मिळवले तसेच मजूर फेडरेशनही ताब्यात ठेवली. तर दुसरीकडे खासदार चिखलीकर यांच्यासह खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर यांनी भाजप सेना युतीच्या माध्यमातून जोरदार टक्कर दिली. पण पदरी अपयश आले.

मात्र, त्यातून निराश न होता मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत १५ पैकी सहा जागा मिळवत चांगलीच लढत दिली. या निवडणुकीवरून लगेचच आगामी निवडणुकीचा अंदाज बांधता येणार नसला तरी महाविकास आघाडी भक्कम राहिली तर विजय निश्चित होण्याची शक्यता अधिक असल्याचा संदेश मिळाला आहे. त्या दृष्टीने आगामी निवडणुकीत राजकारण कोणत्या दिशेने वळण घेईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

वंचित, एमआयएम, बीआरएसकडे लक्ष

राज्यातील वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इतर पक्ष त्याचबरोबर शेजारच्या तेलंगणातील एमआयएम आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्या भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) नांदेड जिल्ह्यात बऱ्यापैकी शिरकाव केला आहे.

त्यामुळे जिल्ह्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना (ठाकरे) तसेच भाजप आणि शिवसेना (शिंदे) या प्रमुख पक्षांसह वंचित, एमआयएम आणि बीआरएसदेखील जिल्ह्यात होणाऱ्या आगामी निवडणुकीच्या मैदानात ताकदीने उतरणार, यात शंका नाही. त्यामुळे बहुरंगी लढती आणि त्यांचे निकाल काय लागणार, याची आत्तापासूनच चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT