file photo 
नांदेड

बिलोलीचे माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णीविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; सेवानिवृत्त तलाठ्याला केली शिवीगाळ

विठ्ठल चंदनकर

बिलोली (जिल्हा नांदेड) : येथील आंबेडकरनगरमधील प्रतिष्ठित नागरिक, सेवानिवृत्त तलाठी तथा माजी नगराध्यक्ष लताबाई जाधव यांचे पती माधवराव जाधव यांना जातिवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल बिलोलीचे माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी याच्याविरुद्ध बिलोली पोलिस ठाण्यामध्ये बुधवारी (ता. १०) ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी दिली आहे.


सेवानिवृत्त तलाठी माधवराव मरीबा जाधव हे मंगळवारी (ता. नऊ) बडूर रस्त्यावरील त्यांच्या शेताकडून घराकडे येत असताना त्यांना एका वळण रस्त्यावर थांबले होते. तेव्हा कारने बिलोलीहून पुढे जाणारे माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी कार थांबवून निवृत्त तलाठी जाधव यांना जातीवर शिवीगाळ करुन तू माजला आहेस, तू माझ्यासमोर कचरा आहेस, घरोघर जाऊन माझ्याविरुद्ध अपप्रचार करीत आहेस, माझे हात वरपर्यंत पोहोचलेले आहेत. बिलोली येथील आंबेडकरनगर गारद करण्याची माझ्यात ताकद आहे. अशी धमकी देऊन त्यांचा अपमान केल्याची तक्रार श्री जाधव यांनी पोलिस ठाण्यांमध्ये दिली.

सदर प्रकार दिलीप शंकरराव उत्तरवाड, मेकानिक माधव मरीबा जाधव व अमोल माधवराव पिल्लेवाड यांच्यासमक्ष घडला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. सेवानिवृत्त तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन बिलोली पोलिस ठाण्यात माजी नगराध्यक्ष कुलकर्णी यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ करीत आहेत.

बिलोली शहरातील सर्वांसोबत चांगले वागणारे सेवानिवृत्त तलाठी जाधव यांचा अपमान केल्याप्रकरणी बिलोलीचे माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे, विजयकुमार कुंचनवार, भीमराव जेठे, माजी उपनगराध्यक्ष गौसोदिन कुरेशी, अर्जुनराव अंकुशकर, नगरसेवक यशवंत गादगे, अनुप अंकुशकर, बालाजी चुनडे, खंडू खंडेराय, रत्नाकर जाधव, युवा प्रमुख इंद्रजित तुडमे पोलिस निरीक्षकांची भेट घेऊन दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली.

कुलकर्णी यांच्याकडून इन्कार..

जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या प्रकाराचा इन्कार करुन आपण आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींचा कधीही अनादर केला नाही. शिवाय जातीवाचक शिवीगाळ करुन कोणाचाही अपमान केला नाही. मी जाधव साहेबांचा नेहमी आदर करत आलो आहे. राजकीय द्वेषातून हा प्रकार पुढे येत असल्याचे माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT