nanded asakal
नांदेड

Nanded News : माहूरच्या ॲट्रॉसिटी प्रकरणाला वेगळे वळण ; सरपंचपतीसह पोलिस पाटलांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

माहूर तालुक्यातील मेंडकी येथे प्रजासत्ताकदिनी पाणी सोडण्यावरून झालेल्या वादात आदिवासी महिला सरपंच यांच्या फिर्यादीवरून अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम व इतर कलमांनुसार माहूर पोलिस ठाण्यात (ता.२७) जानेवारी रोजी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सकाळ वृत्तसेवा

माहूर : तालुक्यातील मेंडकी येथे प्रजासत्ताकदिनी पाणी सोडण्यावरून झालेल्या वादात आदिवासी महिला सरपंच यांच्या फिर्यादीवरून अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम व इतर कलमांनुसार माहूर पोलिस ठाण्यात (ता.२७) जानेवारी रोजी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा नोंद करून गावात परत आल्यानंतर घडलेल्या घटनेत सरपंच पतीसह पोलिस पाटील आणि इतर तिघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला सरपंचासोबत झालेल्या भांडणात संशयित विरुद्ध ॲट्रॉसिटी गुन्हा नोंद करण्यात आला होता. फिर्यादी सरपंच गावात पोहोचल्यानंतर त्यांच्या पती व सहकार्याकडून ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीच्या घरी जाऊन महिलेचे तोंड दाबून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला गेला.

महिलेने आरडाओरडा करून स्वतःची सुटका करून घेतली. यावेळी पोलिस ठाणे गाठून रीतसर फिर्याद दिली. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाणे माहूर येथे मेंडकीचे महिला सरपंच यांचे पती किसन हातमोडे, दिर मारुती हातमोडे, पोलिस पाटील कुंदन कानीराम पवार, बळवंत व्यंकटराव पवार, नंदकिशोर कानीराम पवार यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय पवार हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT