Rto nanded 
नांदेड

ऑटोरिक्षा परवानाधारकांना सानुग्रह अनुदानासाठी नोंदणी करा - अविनाश राऊत

नोंद केलेली माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून खात्री करून घेतली जाणार आहे. त्यानंतर सदर अर्ज हा अनुदान खात्यात जमा होण्यासाठी पुढील कार्यवाहीसाठी पाठविला जाणार येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोविडच्या पार्श्वभुमीवर (Covid-19) राज्य शासनाने ऑटोरिक्षा परवानाधारकांना एक हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. हे अनुदान ऑटोरिक्षा परवानाधारकांच्याच (Autoriksha permit) बँक खात्यात ऑनलाईन जमा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ऑटोरिक्षा परवानाधारकांनी आपली ऑनलाइन माहिती स्वत: च्या मोबाईलवरुन किंवा सीएससी सेंटरवर जाऊन नोंदवावी. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून खाजगी व्यक्ती अथवा कोणत्याही दलालाची नेमणूक केली नाही. परवानाधारकांनी अनाधिकृत व्यक्तीशी संपर्क करु नये, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO Nanded) नांदेड यांनी केले आहे. (Autorickshaw- Licensees- Register- for -help- Grants - Avinash- Raut)

शासनाने ऑटोरिक्षा परवानाधारकांना आर्थिक मदत देण्यासाठी ttps://transport.maharashtra.gov.in/1133/Autorickshaw-Financial-Assistance-Scheme ही प्रणाली विकसीत केली आहे. या प्रणालीत रिक्षा परवानाधारकाला स्वत:चे वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक, आधार क्रमांक आदी माहितीची नोंद करावी लागणार आहे.

हेही वाचा - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. या लाटेत केवळ वयोवृद्धच नाही तर तरुणांनाही मुकावे लागत आहे

नोंद केलेली माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून खात्री करून घेतली जाणार आहे. त्यानंतर सदर अर्ज हा अनुदान खात्यात जमा होण्यासाठी पुढील कार्यवाहीसाठी पाठविला जाणार येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

परवानाधारक रिक्षा चालकाला अर्ज करतांना अडचण आल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या mh26@mahatranscom.in या ईमेल आयडीवर किंवा कार्यालयाच्या 02462-259900 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे स्वत: येऊन संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT